---Advertisement---

“टीम सिलेक्शनसाठी वय नाही तर, ‘हा’ असावा मुख्य निकष”, सचिन तेंडुलकरचा भारतीय संघाला सल्ला

On: शुक्रवार, मार्च 19, 2021 6:09 PM
---Advertisement---

भारतीय संघावर सध्या टीम सिलेक्शन वरून जोरदार टीका होत आहे. खेळाडूंना संघ व्यवस्थापन सातत्याने पुरेशी संधी देत नाहिये, अशा प्रकारची मते चाहते आणि माजी खेळाडू व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने भारतीय संघाला एक महत्वपूर्ण सल्ला दिला आहे.

सचिन तेंडुलकरने टीम सिलेक्शन करतांना खेळाडूंच्या वयाचा विचार केला जाऊ नये, असे म्हंटले आहे. तर वयाऐवजी तुमच्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंना संधी देण्यासाठी प्राधान्य दिले जावे, असा सल्ला सचिनने दिला आहे. सचिन सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज या स्पर्धेत सहभागी झाला असून त्यात ‘इंडिया लिजेंड्स’ संघाचे नेतृत्व करतो आहे.

“सर्वोत्तम खेळाडूंना मिळावी संधी”
एएनआयशी बोलतांना सचिन म्हणाला, “संघात केवळ युवा खेळाडूंना संधी देण्याबाबतच नाही बोलल्या गेले पाहिजे. तुमच्या सर्वोत्तम आणि चांगल्या खेळाडूंना संघात संधी देण्याबद्दल चर्चा व्हायला हवी. तुम्ही ज्यावेळी भारतीय संघातील सिलेक्शन बाबत बोलता तेव्हा वय हा त्याचा निकष असायला नको. तुम्हाला तुमचा उत्तम खेळ करायचा आहे. त्यामुळे वयाने काहीही फरक पडत नाही.”.

“युवा खेळाडूंनाच संधी द्यावी, ही धारणा चुकीची”
पुढे सचिन म्हणाला, “युवा खेळाडूंबद्दल बोलायचे झाल्यास जर त्यांनी चांगले प्रदर्शन केले तर त्यांना नक्कीच संधी मिळायला हवी. पण जर तो चांगले प्रदर्शन करत नसेल तर केवळ युवा खेळाडू आहे म्हणून त्याला संघात संधी देण्यात अर्थ नाही. युवा खेळाडूंनाच संधी द्यायला हवी, ही एक चुकीची धारणा आहे. माझ्या मते तुम्ही तुमचे सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हन निवडायला हवे. तुम्ही तुमचा १४-१५ जणांचा संघ निवडायला हवा आणि त्यानंतर तो बॅलन्स कसा करायचा, ही गोष्ट सिलेक्शन कमिटीने पाहायला हवी.”

इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये
दरम्यान, सचिन तेंडुलकर सध्या रायपुर येथे सुरू असलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत इंडिया लिजेंड्सच्या संघाकडून सहभागी झाला आहे. ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली असून सचिन तेंडुलकरच्या नेतृत्त्वाखालील इंडिया लिजेंड्सच्या संघाने अटीतटीच्या लढतीत वेस्ट इंडिजला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये सचिनने ४२ चेंडूत ६५ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

महत्वाच्या बातम्या:

झिंगाटच! मराठमोळा ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२१ साठी करतोय जोरदार तयारी, पाहा व्हिडिओ

भारताची अजब सिलेक्शन पॉलिसी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सात खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या संघात स्थानच नाही

व्हिडिओ : या खास कारणासाठी ख्रिस गेलने मानले पंतप्रधान मोदींचे आभार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---