रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका बुधवारी (12 जुलै) डॉमिनिकामध्ये सुरू झाला. या सामन्याचा पहिला दिवस रविचंद्रन अश्विनच्या नावावर राहिला. अश्विनने वेस्ट इंडीजच्या 5 विकेट्स घेतल्या. मात्र, हाच अश्विन डब्ल्यूटीसी 2021-23च्या अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवून शकला नव्हता. अश्विनने याविषयी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली.
जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजेच डब्ल्यूटीसी 2021-23 (WTC 2021-23) च्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आमना सामना झाला. याय सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याला खेळपट्टीचे कारण देत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसवले गेले होते. मात्र, अश्विन खेळत नसल्यामुळे संघाला चांगलीच किंमत मोजावी लागली. अश्विन या सामन्यासाठी खूपच उत्सुक होता, पण संघ व्यवस्थापनाच्या निर्णयापुढे तो काहीच करू शकत नव्हता. मागे त्याने एका मुलाखतींमध्ये याविषयी नाराजी व्यक्त केली होती.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या डॉमिनिका कसोटीत हाच अश्विन भारताच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे आणि त्याने पहिल्या डावात विकेट्सचे पंचक घेत वेस्ट इंडीजला अवघ्या 150 धावांवर गुंडाळले. या जबरदस्त कामगिरीनंतर माध्यमांसमोर बोलताना अश्विनला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याविषयी प्रश्न विचारला गेला आणि अश्विन म्हणाला की, “डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याविषयी मला दुःख आहे. आम्ही दोन वेळा अंतिम सामन्यात गेलो आणि जिंकू शकलो नाही, याचे याची मनापासून खंत वाटते. आता इथे वेस्ट इंडीजमध्ये नवीन डब्ल्यूटीसी हंगामाची सुरुवात करताना माझे प्रदर्शन चांगले राहिले. असे प्रदर्शन करून मी खूप आनंदी आहे. संघानेही नव्या डब्ल्यूटीसी हंगामाची सुरुवात चांगली राहिली आहे.”
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यातून वगळण्याविषयी अश्विन म्हणाला, “मी याविषयी आधीही बोललो आहे. अंतिम सामन्यासाठी मी पूर्णपणे तयार होतो. मी फिटनेसही मिळवली होती आणि रणनीतीही आखली होती. तुम्ही पूर्णपणे तयार असाल, पण ऐन वेळी सामन्यातून बाहेर झाला, तर स्वतःला कसे सिद्ध करणार. या जगात कोणताच क्रिकेटपटू किंवा व्यक्ती असा नाहीये, ज्याने आयुष्यात चढ उतार पाहिले नाहीत. जेव्हा आयुष्यातील वाईट काळातून जात असता, तेव्हा तुमच्याकडे दोन संधी असतात. पहिली म्हणजे याविषयी तक्रार करत राहणे आणि दुसरी संधी अशी की, यातून नवीन गोष्टी शिकण्याची. मी दुसऱ्या प्रकारातील व्यक्तिंमध्ये मोडतो, जे अडचणीतही शिकतात संधी सोडत नाहीत.”
दरम्यान, डॉमिनिका कसोटीच्या पहिल्या दिवसी वेस्ट इंडीड 150 धावांवर बाद झाल्यानंतर भारततीय संघ फलंदाजीला आला. रोहित शर्मा आणि यशश्वी जयस्वाल यांनी दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची धावसंख्या बिनबाद 80 पर्यंत नेली. जयस्वाल 40*, तर रोहित शर्मा 30* धावांसह खेळपट्टीवर कायम आहे. (After taking five wickets against West Indies, Ashwin expressed his displeasure at not getting a chance for WTC final.)
महत्वाच्या बातम्या –
यशस्वी-रोहितकडून 40 वर्षे जुन्या इतिहासाची पुनरागवृत्ती, गावसकर-शास्त्रींशी मोठे कनेक्शन; वाचा लगेच
‘आम्ही त्याच्यासाठी संघातील वातावरण…’, युवा पदार्पणवीराबद्दल अश्विनचं मोठं भाष्य