---Advertisement---

मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद

On: गुरूवार, जुलै 13, 2023 2:53 PM
Shubman-Gill
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर अनेक खेळाडू मजा-मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे आपण पाहिले आहे. विराट कोहली, ख्रिस गेल यांसारख्या दिग्गज खेळाडूंना मैदानावर संघसहकाऱ्यांची चेष्टा करताना, डान्स करताना सर्वांनी पाहिले आहे. या खेळाडूंच्या यादीत आता आणखी एका खेळाडूचे नाव सामील झाले आहे. तो खेळाडू इतर कुणी नसून भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आहे. शुबमनचा चालू सामन्यात डान्स करतानाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

डॉमिनिका येथे वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघाला पहिल्या डावात 150 धावांवर सर्वबाद केले. सामन्यादरम्यान जेव्हा यजमान 63 षटकात 9 बाद 148 धावांवर खेळत होते, तेव्हा शुबमन गिल (Shubman Gill) मैदानातच डान्स करू लागला. त्याचा यादरम्यानचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत वेस्ट इंडिज संघाची अखेरची जोडी रहकीम कॉर्नवॉल आणि जोमेल वॉर्किन क्रीझवर होते. षटकातील ब्रेकदरम्यान कॉर्नवॉल आणि वॉर्किन जेव्हा चर्चा करून परत क्रीझवर येत होते, तेव्हा अचानक शुबमनचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. शुबमन वेस्ट इंडिजचा खेळाडू वॉर्किनच्या मागे डान्स करू लागला. मात्र, वेस्ट इंडिजच्या खेळाडूने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. तसेच, गिलच्या शेजारी थांबलेल्या विराट कोहली (Virat Kohli) याच्या चेहऱ्यावरही स्मितहास्य पाहायला मिळाले.

अश्विनने रचले विक्रमांचे मनोरे
भारतीय संघाचा दिग्गज फिरकीपटू आर अश्विन याने या सामन्यात 3 विकेट्स घेताच आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700 विकेट्स पूर्ण केले. अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. अश्विनच्या नावावर कसोटीत 702 विकेट्स झाल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 479 विकेट्सची नोंद आहे. विशेष म्हणजे, त्याने या सामन्यात विकेट्सचे पंचकही पूर्ण केले होते. त्यामुळे कसोटीच्या एका डावात सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेण्याची ही त्याची 33वी वेळ होती. याबाबतीत त्याने इंग्लंडचा दिग्गज जेम्स अँडरसन याला मागे टाकले आहे. त्याने 32 वेळा अशी कामगिरी केली आहे.

अश्विनव्यतिरिक्त रवींद्र जडेजाने सामन्यात 3 विकेट्स घेतल्या. तसेच, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनीही प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावावर केली.

भारतीय संघाच्या डावाविषयी बोलायचं झालं, तर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने एकही विकेट न गमावता 80 धावा केल्या. यशस्वी जयसवाल नाबाद 40, तर रोहित शर्मा नाबाद 30 धावांवर खेळतोय. भारतीय संघ वेस्ट इंडिजपासून अजून 70 धावा मागे आहे. (ind vs wi 1st test day 1 indian cricketer shubman gill dance video viral)

महत्वाच्या बातम्या-
महिलांच्या ऍशेसमध्ये पाहायला मिळाला अफलातून कॅच, खेळाडूने उडी मारून एका हाताने टिपलेला झेल पाहाच
‘आम्ही त्याच्यासाठी संघातील वातावरण…’, युवा पदार्पणवीराबद्दल अश्विनचं मोठं भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---