टी20 विश्वचषक विजेती भारतीय टीम मायदेशी परतल्यानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर विक्ट्री परेडचं आयोजन करण्यात आलं होतं. बुधवारी (3 जुलै) सायंकाळी झालेल्या या परडेमध्ये लाखोंच्या संख्येनं गर्दी जमली होती. या परेडमथील विहंगम दृष्य आणि लाखोंच्या जनसमुदायाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र या परेडमुळे मुंबईच्या जनतेचे खूप हाल देखील झाले आहेत. वास्तविक, या परेडनंतर मरीन ड्राइव्हवरून तब्बल 11,000 किलो कचरा गोळा करण्यात आला आहे!
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विक्ट्री परेड संपल्यानंतर रात्रभर मरीन ड्राईव्हची साफसफाई केली. या कामासाठी पालिकेचे सुमारे 100 कर्मचारी जुंपले होते. एका रिपोर्टनुसार, साफसफाई दरम्यान एकूण 11 हजार किलो कचरा काढण्यात आला. विक्ट्री परेडची सुरुवात नरिमन पाईंटवर होऊन तिचा शेवट वानखेडे स्टेडियमवर झाला होता. या परेडनंतर रस्त्यावर अनेक लोकांच्या चपला पडलेल्या दिसल्या. याशिवाय पाण्याच्या बॉटल्स आणि इतर सामान देखील मिळालं. ही सर्व साफसफाई करण्यासाठी पालिकेला एक अख्खी रात्र लागली. गोळा करण्यात आलेला कचरा 2 मोठे बंपर आणि 5 जिपमधून भरून नेण्यात आला.
बीएमसीऩं (BMC) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट टाकत या सफाई अभियानाची माहिती दिली आहे. पालिकेनं लिहिलं, टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर रात्री उशीरा पर्यंत चाहत्यांची गर्दी जमली होती. या परेडनंतर बीएमसीनं संपूर्ण मरीन ड्राईव्ह आणि आजूबाजूच्या परिसरात सफाई अभियानं राबवलं. संपूर्ण परिसराला स्वच्छ करण्यात आलं असून, मरीन ड्राईव्हचा रस्ता मुंबईकरांसाठी मोकळा करण्यात आला आहे. सफाई अभियानादरम्यान 2 मोठे बंपर आणि 5 जिप भरून कचरा बाहेर काढण्यात आला.
🏆 A sea of cricket fans gathered at Marine Drive in Mumbai until late last night to welcome the Indian Cricket Team after their victory in the T20 Cricket World Cup 2024.
🧹 After the grand welcome and once the crowd dispersed, Brihanmumbai Municipal Corporation (BMC) conducted… pic.twitter.com/JruPxUAfLo
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2024
महत्त्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महाराष्ट्रातील विश्वविजेत्या खेळाडूंना तब्बल इतक्या कोटींचं बक्षीस जाहीर
मुंबईत बनणार नवं क्रिकेट स्टेडियम, वानखेडे पेक्षा चारपट असेल आसन क्षमता!
थालाची हवा; वाढदिवासाआधी चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ! इथे लावला चक्क 100 फुटी कट आऊट