टीम इंडियानं यंदाच्या टी20 विश्वचषक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवून टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या स्पर्धेत भारतीय संघ एकही सामना हरला नाही. भारतानं टी20 विश्वचषकाची दुसरी ट्राॅफी जिंकली. याआधी 2007च्या टी20 विश्वचषकात भारतानं धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. तर आता तब्बल 13 वर्षांनंतर भारतानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी ट्राॅफीवर नाव कोरले.
तत्पूर्वी या सामन्यात सूर्यकुमारच्या एका झेलनं ही ट्रॉफी भारताच्या झोतात आली. सूर्याची पत्नी देविशा शेट्टीही सामना पाहण्यासाठी आली होती. विजयानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) यांची एक खास पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
टीम इंडियाच्या विजयानंतर देविशा शेट्टीनं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज रात्री चांगली झोप येईल.” या फोटोत सूर्यकुमार यादव आणि देविशा शेट्टी एकत्र झोपलेले दिसत आहेत आणि दोघांच्या मध्ये टी20 विश्वचषकाची ट्राॅफी आहे. याशिवाय देविशा शेट्टीनं आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती आणि सूर्यकुमार ट्रॉफी हातात घेताना दिसत आहेत आणि त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये देविशा शेट्टीनं लिहिले, “अविश्वसनीय”.
View this post on Instagram
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) जेव्हा ट्रॉफी घेण्यासाठी स्टेजवर गेला तेव्हा त्यानं सर्वप्रथम बेबी स्टेप डान्स मूव्ह केला आणि हे करत असताना तो स्टेजवर पोहोचला. स्टेजवर आधीच उभे असलेले खेळाडू त्याला साथ देताना दिसले. सूर्यकुमार यादव रोहितच्या डान्स मूव्ह्सलाही फॉलो करत होता. सूर्यानं 2016 मध्ये त्याची कॉलेज फ्रेंड देवीशासोबत लग्न केले होते आणि 2010 मध्ये आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन दरम्यान ते भेटले होते. देविशा एक डान्सर आहे, सूर्यकुमार तिला एका कार्यक्रमात डान्स करताना पाहून तिच्या प्रेमात पडला होता.
सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) त्याच्या टी20 आंतरराष्ठ्रीय कारकिर्दीमध्ये 68 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 43.33च्या सरासरीनं 2,340 धावा ठोकल्या आहेत. यादरम्यानं त्याचा स्ट्राईक रेट 167.47 राहिला आहे. त्यानं टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत 4 शतक आणि 19 अर्धशतक ठोकले आहेत. यादरम्यानं त्याची सर्वोच्च धावसंख्या 117 राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित- कोहलीचा प्लॅन यशस्वी, टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर राहुल द्रविडचं भन्नाट रुप समोर
वर्ल्डकप जिंकल्यानंतर पत्नीनं घेतली मुलाखत पण बुमराहला शब्द फुटेना, पाहा मैदानावरील व्हिडिओ
3 खेळाडू जे रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे कर्णधार बनू शकतात