Shubman Gill could become the ODI captain of the Indian team: रोहित शर्माच्या कसोटी निवृत्तीनंतर शुबमन गिलला भारतीय संघाचा नवा कसोटी कर्णधार बनवण्यात आलं आहे. गिल, जो सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्माने अजून वनडे फॉरमॅटला निरोप दिलेला नाही, पण सोशल मीडियावर भारतीय वनडे संघाचा कर्णधार बदलण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पुढच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माऐवजी शुबमन गिल करेल, असा दावा केला जात आहे. (Shubman Gill captain)
‘स्पोर्ट्स तक’च्या एका रिपोर्टनुसार, 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये शुबमन गिल भारतीय संघाची धुरा सांभाळेल, अशी योजना आहे. (2027 World Cup captain) मात्र, रोहित कधीपर्यंत आपले कर्णधारपद सुरक्षित ठेवू शकेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Rohit Sharma captaincy future) तर, आणखी एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, भारत जेव्हाही आपली पुढची वनडे मालिका खेळेल, त्यात रोहित शर्माऐवजी शुबमन गिल कर्णधार असेल. सध्याच्या वेळापत्रकानुसार, भारतीय संघाला पुढील वनडे मालिका ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायची आहे.
शुबमन गिलच्या आतापर्यंतच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने आतापर्यंत 55 सामन्यांमध्ये 59.04 च्या उत्कृष्ट सरासरीने 2,775 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 8 शतकांसह 15 अर्धशतके झळकावली आहेत. (Shubman Gill ODI record)
भारतीय संघाची पुढील वनडे मालिका ऑगस्ट महिन्यात बांगलादेशसोबत होणार होती, परंतु हा दौरा रद्द करण्यात आला आहे. जर बांगलादेशविरुद्धची व्हाईट बॉल मालिका झाली नाही, तर भारतीय संघाची पुढील वनडे मालिका ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. (Team India next ODI series) 2025 च्या समाप्तीपूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळायची आहे.






