भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली. या मालिकेत भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही. भारत आणि श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळाली होती. परंतु, शेवटी हा सामना बरोबरीत सुटला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताला 32 धावांनी पराभूत केलं, तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 110 धावांनी धुव्वा उडवला आणि 2-0 ने मालिका खिशात घातली. यावर आता भारताचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं मोठा दावा केला आहे.
दिनेश कार्तिकन (Dinesh Karthik) क्रिकबझशी बोलताना सांगितले की, अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे कठीण असते जिथे फिरकीपटूंना खूप मदत मिळते. कार्तिक म्हणाला की, “या मालिकेत विराट कोहली (Virat Kohli) असो, रोहित शर्मा (Rohit Sharma) असो किंवा इतर कोणीही असो, 8-30 षटकांमध्ये नवीन चेंडूने फलंदाजी करणे खूप अवघड असते. काळजी करण्याची गरज नाही, अनेक खेळपट्ट्या अशा काम करत नाहीत, पण फिरकीपटूंविरुद्ध खेळण्यासाठी ही खेळपट्टी अवघड झाली आहे. मी येथे विराट कोहलीचा बचाव करणार नाही, पण येथे फिरकी गोलंदाजी खेळणे खूप कठीण आहे.”
श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज महीश तीक्ष्णा म्हणाला की, “भारतीय फलंदाजांच्या संघर्षाचे कारण म्हणजे त्यांना घरच्या मैदानावर चांगल्या विकेट्सवर खेळण्याची सवय आहे. भारतात सहसा चांगल्या विकेट्स आणि छोट्या बाउंड्रीवर खेळतात. प्रेमदासामध्ये खेळताना आम्हाला माहित होते की, थोडा जरी चेंडू वळला तरी आम्ही त्याचा फायदा घेऊ शकतो कारण आमच्याकडे चांगले फिरकीपटू आहेत.”
विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं, तर कोहली टी20 विश्वचषकात देखील भारतासाठी फ्लाॅप ठरला होता. पण फायनलमध्ये त्यानं उत्कृष्ट खेळी खेळली आणि सामनावीर पुरस्कार पटकावला. श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत कोहलीची फलंदाजी पुन्हा फ्लाॅप ठरली. तो एकाही सामन्यात 30 धावसंख्य़ा ओलांडू शकला नाही. तिन्ही सामन्यात तो फिरकीपटूंविरुद्ध एलबीडब्ल्यू बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
227 दिवसांनी अनुभवी फलंदाज मैदानात; पहिल्याच सामन्यात मोठी खेळी, टी20 संघात मिळणार का स्थान?
सुवर्ण पदक जिंकणाऱ्या आणखी एका महिला बॉक्सरवर पुरुष असल्याचा आरोप, जागतिक स्पर्धेत घातली होती बंदी
मनू भाकर-सरबज्योत सिंग यांनी नाकारली सरकारी नोकरी, कारण जाणून तुम्ही पण व्हाल थक्कं!