अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका पाकिस्तानने आपल्या नावावर केली. गुरुवारी (24 ऑगस्ट) झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात पाकिस्तानने रोमहर्षक विजय मिळवला. दोन्ही संघ विजयासाठी शेवटच्या षटकापर्यंत खेळले. पण अवघा एक चेंडू बाकी असताना पाकिस्तानने विजय मिळवला. सामना संपल्यानंतर पाकिस्तानच कर्णधार बाबर आझम संतापल्याचे पाहायला मिळाले. बाबर आणि अफगाणिस्तानच्या खेलाडूंमध्ये झालेला वाद सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाबर आझम मागच्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महत्वाचा खेळाडू बनला आहे. अनेकदा त्याची तुलना जगातील सर्वोत्तम फलंदाजांसोबत केली जाते. वैयक्तिक प्रदर्शनासोबतच कर्णधार म्हणून देखील त्याने चांगले प्रदर्शन केले आहे. एक संयमी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा बाबर गुरुवारी (24 ऑगस्ट) मात्र संतापला होता. त्याने पाकिस्तानच्या विजयात 66 चेंडूत 53 धावांचे योगदान दिले. पण विजय मिळवल्यानंतर विरोधी संघाच्या काही खेळाडूंसोबत हातमिळवणी करण्यात नकार दिल्याचे व्हिडिओत पाहायला मिळाले. चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत.
https://twitter.com/SharyOfficial/status/1694795562124460212?s=20
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर पाकिस्तानने एक विकेट आणि एक चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. 50 षटकात यजमान संघाने 5 बाद 300 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने 301 धावांचे लक्ष्य 49.5 षटकात आणि 9 विकेट्सच्या नुकसानावर गाठले. शादाब खान सामनावीर ठरला, ज्याने 35 चेंडूत 48 धावांची महत्वपूर्ण खेळी केली.
अफगाणिस्तानसाठी रहमनुल्ल्हा गुरबाझ याने 151 चेंडूत 151 धावांची जबरदस्त खेळी केली. सलामीवीर इब्राहिम झद्रान याने गुरबाझला चांगली साथ देत 80 धावांची खेळी केली. परिणामी अफगाणिस्तान संघ 300 धावांपर्यंत मजल मारू शकला. पण त्यांचे गोलंदाज पाकिस्तानच्या धावांवर लगाम लावण्यात कमी पडले. सलामीवीर इमाम-उल-हक याने पाकिस्तानसाठी 91 धावांची सर्वोत्तम खेळी केली. (After the end of the second match against Afghanistan, Babar Azam had an argument on the field)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषक 2023मध्ये संधी न मिळालेल्या भारतीय दिग्गजचा मोठा निर्णय, धरली इंग्लंडची वाट
आशिया कपवर कोरोनाचे सावट! स्पर्धा सुरू होण्याआधीच घडलं असं, लगेच वाचा