आशिया चषक 2023साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन झाले आहे. मात्र, अनुभवी वेगवान गोलंदाज उमेश यादव याचे नाव यावेळीही वनडे संघात नव्हते. आशिया चषकासाठी संधी न मिळालेला हा वेगवान गोलंदाज येत्या काळात इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळताना दिसेल. यासाठी त्याने ऍसेक्स संघासोबत करार देखील केला आहे.
सध्या सुरू असलेल्या काऊंटी क्रिकेट हंगामात ऍसेक्स संघ (Essex County Team) डिव्हिजन एकचा भाग असून अजून तीन सामने खेळायचे आहेत. या तीन सामन्यांसाठी उमेश यादव (Umesh Yadav) याने संघासोबत करार केला आहे. अशात या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय वेगवान गोलंदाज आपली छाप पाडण्याच्या प्रयत्नात असेल. उमेशने स्वतः आपण ऍसेक्स संघासोबत जोडले गेल्याची पुष्टी केली आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज डग ब्रेसवेल याच्या जागी उमेश ऍसेस्कसाठी खेळताना दिसेल. डग ब्रेसवेल दुखापतीमुळे चालू काऊंटी हंगामातून बाहेर पडला आहे.
उमेश यादव यापूर्वीही काऊंटी क्रिकेट खेळला आहे. पण त्यावेळी याआधी मिडलसेक्स संघासाठी खेळणार उमेश यादव यावेळी नव्या संघाच्या जर्सीत दिसणार आहे. मागच्या वेळी उमेशला दुखापतीमुळे काऊंटी हंगामातून माघार घ्यावी लागली होती. पण यावेळी वेगवान गोलंदाज फिटनेसवर लक्ष देताना दिसेल. ऍसेक्स संघाकडून उमेश यादवचे स्वागत केले गेले आहे. संघाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून उमेशचा पोटो पोस्ट केला गेला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “उमेश अनुभवाचा खजीना सोबत घेऊन येत आहे.”
👀 Bringing a wealth of experience to CM2!
🦅 #FlyLikeAnEagle pic.twitter.com/9D2ZlWdmoy
— Essex Cricket (@EssexCricket) August 24, 2023
उमेश यादवने ऑक्टोबर 2018 नंतर वनडे क्रिकेटमध्ये एकही सामना खेळला नाहीये. अशात आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठीही तो भारतीय संघाचा भाग नसणार, हे आधीपासूनच जवळपास निश्चित मानले जात होते. अशात उमेश यादव स्वतः देखील ऍसेक्स संघाकडून खेळण्यासाठी उत्सुक दिसत आहे. तो म्हणाला की, “संघात सामील झाल्यामुळे आनंदी आहे. यावर्षीच्या हंगामात राहिलेल्या काही सामन्यांमध्ये संघाच्या यशात योगदान देऊ इच्छित आहे.”
https://twitter.com/EssexCricket/status/1694711163685081189?s=20
उमेश यादवच्या कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 57 कसोटी, 75 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 170, 106 आणि 12 विकेट्स घेतल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी अप्रतिम आहे. 112 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये उमेश यादवने 347 विकेट्स घेतल्या आहेत. ऍसेक्ससाठीही येत्या काही दिवसांमध्ये त्याचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल.
महत्वाच्या बातम्या –
आशिया कपवर कोरोनाचे सावट! स्पर्धा सुरू होण्याआधीच घडलं असं, लगेच वाचा
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत क्वालिफायर १मध्ये रेव्हन्स, हॉक्स संघांचा प्रवेश