इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच क्रिकेट चाहत्यांना अनेक अटीतटीचे सामने पाहायला मिळाले आहेत. मंगळवारी (२७ एप्रिल) झालेल्या सामन्यात देखील असेच काहीतरी चित्र पाहायला मिळाले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत माहीत नव्हते की, सामना कोणता संघ जिंकणार आहे. या सामन्यात दिल्ली संघाला १ धावाने पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांची झुंज अपयशी ठरली. तसेच हा सामना संपल्यानंतर त्यांची रिऍक्शन बघण्यासारखी होती.
बेंगलोर संघाने दिलेल्या १७२ धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघातील मुख्य फलंदाज लवकर माघारी परतले होते. त्यामुळे सामना जिंकवण्याची जबाबदारी कर्णधार रिषभ पंतवर आली होती. तसेच दिल्ली संघाची स्थिती ४ गडी बाद ९२ धावांवर असताना हेटमायरने मैदानात एन्ट्री केली होती. त्याने पंतसोबत मिळून महत्वाची भागीदारी केली होती.
यासोबतच काईल जेमिसनच्या एकाच षटकात ३ षटकार लगावत त्याने अर्धशतक देखील झळकावले होते. तसेच पंतनेही अर्धशतक केले होते. शेवटच्या चेंडूवर दिल्ली संघाला ६ धावांची आवश्यकता असताना पंतने चौकार मारला आणि बेंगलोर संघाने १ धावेने हा सामना आपल्या नावावर केला.
रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर झाले भावूक
इतक्या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना पंत आणि हेटमायर यांनी उत्कृष्टरित्या फलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले होते. हेटमायरने ५३ धावांची खेळी केली होती तर पंतने ५८ धावांची खेळी केली होती. परंतु शेवटच्या चेंडूवर पंतला विजयी षटकार मारण्यात अपयश आले होते. सामना गमावल्यानंतर हेटमायर नॉन स्ट्राइकवर भावूक झाल्याचे दिसून आला. तो खूप वेळ तिथेच बसून होता. तर पंत देखील भावूक झाला होता.
त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांनी त्यांना सांत्वना दिली होती. हेटमायर आणि पंतचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
What. A. Match!@RCBTweets prevail by 1 run. With 6 needed off the final ball, Pant hits a boundary but @DelhiCapitals fall short by a whisker. Siraj does well under pressure.
Hetmyer and Pant are distraught. https://t.co/NQ9SSSBbVT #DCvRCB #VIVOIPL pic.twitter.com/ju87soRG6B
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2021
https://twitter.com/KiwiYash/status/1387105005652516864?s=20
Feel for hetmyer, scored 53 in just 25 balls and still on the losing side. Sometimes cricket goes this way, keep the head high, Hetty. pic.twitter.com/dNRuW629oH
— Bhawana (@bhawnakohli5) April 27, 2021
Teams to lose most matches by 1 run
DC 3*
CSK 2
MI,Deccan,RR,PWI,KXIP,RPSG 1#RCBvsDC #DelhiCapitals #ShimronHetmyer https://t.co/DQNUtXVh2w pic.twitter.com/2ObFqBZZuF— Shivasis Mohanty (@DrShivasis) April 27, 2021
Feeling bad for don Hetmyer pic.twitter.com/SJ3lQirmzd
— R A T N I S H (@LoyalSachinFan) April 27, 2021
https://twitter.com/Adi_Rukhster06/status/1387242667520663556?s=20
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने उभारला होता १७१ धावांचा डोंगर
या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगलोर संघाकडून एबी डिविलियर्सने तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. त्याने अवघ्या ४२ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांचा मदतीने नाबाद ७५ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर बेंगलोर संघाने १७१ धावांचा डोंगर उभारला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बेंगलोर-दिल्ली सामन्यात दर्शकांना घडलं सचिनचं दर्शन! पृथ्वी शॉच्या ‘त्या’ कृत्याने रंगली एकच चर्चा
सलाम भावा! फक्त १ धावेने पराभूत झाल्यानंतर पंत आला रडकुंडीला, विराटने ‘अशी’ कृती करत जिंकले मन
RCB vs DC : पंत-हेटमायरची झुंज अपयशी, रंगतदार सामन्यात आरसीबीचा अवघ्या एका धावेने विजय