---Advertisement---

वर्ल्डकप गमावल्यानंतर पहिल्यांदा सोशल मीडियावर रोहित ऍक्टिव्ह, केली खास पोस्ट

Rohit Sharma
---Advertisement---

यावर्षी भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वात वनडे विश्वचषक खेळला. अंतिम सामन्यापर्यंत अजिंक्य राहणारा भारत अंतिम सामन्यातम मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. रोहित शर्मा याचे विश्वचषक उंचावण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. संघ आणि कर्णधार या पराभवानंतर चांगलेच निराश झाले आहेत. विश्वचषक गमावल्यानंतर रोहित मागच्या काही दिवसांपासून माध्यमांसमोर किंवा कुठेच दिसला नव्हता. रविवारी (26 नोव्हेंबर) चाहत्यांना अखेर रोहितबाबत माहिती मिळू शकली.

यावर्षीचा विश्वचषक भारतात खेळला गेला. भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आणि आयसीसी यांनी विश्वचषकासाठी जंगी तयारी केली होती. बीसीसीआय विश्वचषकाच्या आयोजनात कुठेच कमी पडल्याचे दिसले नाही. पण यजमान भारतीय संघ विश्वचषक जिंकू शकला नाही. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 6 विकेट्सने मात दिली. त्याआधी स्पर्धेतील 10 पैकी 10 सामने भारताने जिंकले होते. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचे नेतृत्व आणि वैयक्तिक खेळी या महत्वाच्या स्पर्धेत अप्रतिम राहिली. पण अंतिम सामन्यातील पराभवानंतर कर्णधार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

रविवारी (26 नोव्हेंबर) रोहितने अखेर आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून रोहितने हा फोटो शेअर केला आहे. मागच्या काही दिवसांपासून रोहित शर्मा चाहत्यांना कुठेच दिसला नव्हता. तसेच त्याच्याबाबत कुठली बातमी देखील समोर येत नव्हती. अशात रोहितने शेअर केलेली स्टोरी चर्चेत आहे. फोटोत त्याच्यासोबत पत्नी रितिका देखील दिसत आहे.

दरम्यानच्या काळात रोहितबाबत ज्या बातम्या समोर आल्या, त्यामध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटशी संबंधित महत्वाची माहिती समोर आली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना भविष्यात भारतासाठी टी-20 क्रिकेट केळायचे की नाही, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार बीसीसीआयने हा निर्णय या दोन दिग्गजांवर सोपवला आहे. दुसरीकडे सोमवारी (27 नोव्हेंबर) हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. अशात आगामी आयपीएल हंगामात रोहित मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणार की नाही, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. (After the ODI World Cup defeat, Rohit Sharma has been seen active on social media for the first time)

महत्वाच्या बातम्या – 
एमएसएलटीए 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथन याला दुहेरी मुकुट 
घरवापसी झाल्यानंतर हार्दिक पंड्याची पहिली रिऍक्शन, ‘खूप साऱ्या आठवणी…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---