जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अंतिम सामना इंग्लंडच्या ओव्हल स्टेडियमवर खेळला गेला असून शनिवारी (10 जून) शुबमन गिल चर्चेचा विषय ठरला. कॅमरून ग्रीन याने गिलचा घेतलेला झेल आणि पंचांनी दिलेला निर्णय यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा रविवारी (11 जून) सामना संपल्यानंतर माध्यमांसमोर बोलला.
भारतीय संघाला डब्ल्यूटीसीच्या या अंतिम सामन्यात विजयासाठी 444 धावांचे लक्ष्य मिळाले होते. रोहित शर्मा आणि शुबमन गिल ही सलामीवीर जोडी शेवटच्या डावात चांगली लयीत दिसत होती. पण शुबमन गिल शनिवारी म्हणजेच सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने गिलच्या रूपात पहिली विकेट गमावली. दुसऱ्या डावातील आठव्या षटकात स्कॉट बोलँड गोलंदाजी करत होता. षटकातील पहिल्याच चेंडूवर गिलने गली आणि स्लीप्सच्या मते अभा अललेल्या कॅमरून ग्रीनच्या हाताच झेल दिला.
ग्रीनने हा झेल पकडला, पण तो अचूक होताच, असे कोणी खात्रीशीर म्हणू शकत नव्हते. स्वतः ग्रीन देखील या झेलविषयी संभ्रमात दिसत होता. पण अखेर पंचांनी हा झेल अचूक असल्याचा निर्णय दिला आणि गिलला खेळपट्टी सोडावी लागली. पंचांनी जरी गिलला बाद दिले असले, तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये ग्रीनच्या हातातून चेंडू मजिनीला टेकल्याचे पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील पंचांच्या निर्णयाशी असहमत असल्याचे पाहायला मिळाले. रोहितच्या मते डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासारख्या महत्वाच्या सामन्यात मैदानता अधिक कॅमेरे हवे होते, जेणेकरून वेगवेगळ्या ऍन्गलने एक व्हिडिओ पाहता येईल.
डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकरल्यानंतर रोहित शर्मा () माध्यमांत बोलण्यासाठी आला. यावेळी रोहितला शुबमन गिलच्या विकेटविषयी प्रश्न विचारला गेला. रोहित म्हणाला, “गिलचा झेल अजून कॅमेरा ऍन्गलने दाखवला पाहिजे होता. आयपीएलमध्ये 10 वेगवेगळे कॅमेरे आहेत. जेणेकरून अनेक ऍन्गलने पाहाता येईल.” रोहितने आयसीसीच्या अंतिम सामन्याची तुलना थेट आयपीएलसोबत केल्याने त्याचे हे वक्तव्य सध्या क्रीडाजगतात चर्चेचा विषय ठरत आहे.
उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियासाठी पहिल्या डावात ट्रेविस हेड आणि स्टीव स्मिथ यांनी केलील महत्वपूर्ण खेळी, संघासाठी फायद्याची ठरली. पहिल्या डावात मिळवलेली आघाडी ऑस्ट्रेलियाने शेवटपर्यंत कायम ठेवली. सोबतच गोलंदाजी विभागात स्कॉट बोलंड, मिचेल स्टार्क आणि कर्णधार पॅट कमिन्स या त्रिकूटाने भारतीय गोलंदाजांचा अक्षरशः घाम काढला. त्याचसोबत फिरकीसाटी अनुकूल वाटत असलेल्या ग्रीन टॉप खेळपट्टीवर फिरकीपटू नाथन लायन यानेही कमाल दाखवली. लायनने पहिल्या डावात एक, तर दुसऱ्या डावात तब्बल चार विकेट्स घेतल्या. भारताचा दिग्गज फिरकीपटू रविचंद्रन अश्विन प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असल्यामुळे संघ व्यवस्थापनावर चाहते आणि जाणकारांकडून जोरदार टिका झाल्याचेही पाहायला मिळाले. (After the Shubman Gill catch controversy, Rohit compared WTC and IPL)
महत्वाच्या बातम्या –
डब्ल्यूटीसी फायनलमध्येही धोनीच कर्णधार पाहिजे होता! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीती असेच म्हणाल
आयसीसी ट्रॉफींचा बादशाह फक्त ऑस्ट्रेलिया! 1-2 नाही, तर ‘एवढे’ किताब नावावर, पाहा वर्ष आणि स्पर्धांची यादी