बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना खेळला गेला. हा सामना रावलपिंडी मैदानावर रंगला होता. या सामन्यात बांगलादेशनं 10 गडी राखून पाकिस्तानला धूळ चारली. पाकिस्तानचा संघ पहिल्यांदाच घरच्या मैदानावर 10 विकेट्सनं पराभव झाला. पण पाकिस्तानच्या या पराभवानं बांगलादेशला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला आहे. मात्र, पराभवामुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं.
रावलपिंडी कसोटीतील विजयासह बांगलादेश क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेशच्या गुणांची टक्केवारी 40 वर पोहोचली, तर त्यांचे गुणतालिकेत सध्या 24 गुण आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक विजयापूर्वी बांगलादेश संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर होता. पण पहिल्याच कसोटी सामन्यात दमदार कामगिरी करुन बांगलादेशनं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली.
बांगलादेशविरुद्धच्या निराशाजनक पराभवापूर्वी पाकिस्तानचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर होता. पण आता पाकिस्तान संघाची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. सध्याच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या चक्रात पाकिस्ताननं 6 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 2 विजय मिळवले आहेत. पाकिस्तानचे गुणतालिकेत सध्या 28 गुण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघातून बाहेर होणार ‘हे’ ३ खेळाडू! आझमचाही समावेश
VIDEO: “हत्या नक्कीच यानं…” चाहत्यांच्या निशान्यावर पुन्हा बांगलादेशचा माजी कर्णधार
‘कोहलीने आणखी काही वर्षे कसोटी कर्णधारपदी राहायला हवे होते,’ माजी प्रशिक्षकाचा प्रश्न