भारतात सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 6 व्या फेरीत बंगाल विरुद्ध हैद्राबाद संघात सामना सुरु आहे. या सामन्यात खेळताना बंगालकडून मनोज तिवारीने(Manoj Tiwari) सोमवारी(20 जानेवारी) त्रिशतकी खेळी केली आहे.
ही त्रिशतकी खेळी केल्यानंतर तिवारीने त्याला आयपीएल 2020साठी कोणत्याही संघाने पसंती न दाखवल्याबद्दल निराशा व्यक्त केली आहे.
आयपीएल 2020 चा लिलाव (IPL2020 Auction) 19 डिसेंबर 2019ला पार पडला. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना मोठ्या रकमेने विकत घेण्यात आले. परंतु तिवारीला या लिलावात एकाही संघाने विकत घेतले नाही. याबद्दल तिवारीने आपले मत व्यक्त केले आहे.
सोमवारी त्रिशतक केल्यानंतर तिवारी म्हणाला की, “आयपीएलमध्ये विकले न जाण्याची गोष्ट पचवणे खूप कठीण होती. निश्चितच जेव्हा तुम्ही एवढ्या साऱ्या युवा खेळाडूंना खेळताना पाहता तेव्हा वाईट वाटते. मी जेव्हा घरी बसून त्यांना पाहतो तेव्हा मला असे वाटते की तो शॉट मी खेळू शकलो असतो.”
“कदाचीत फ्रेंचायझीचे व्यवस्थापन काहीतरी वेगळी गोष्ट पाहत होते,” असेही तिवारी यावेळी म्हणाला.
सोमवारी (20 जानेवारी) रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत हैदराबादविरुद्ध (Hyderabad vs Bengal) बंगाल संघाकडून खेळताना तिवारीने 414 चेंडूंचा सामना करताना 30 चौकार आणि 5 षटकारांसह 73.19 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 303 धावा केल्या. तिवारीचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिले त्रिशतक आहे.
तसेच तिवारी देवांग गांधीनंतर (Devang Gandhi) रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक करणारा बंगाल संघाचा दुसराच खेळाडू बनला आहे. देवांग गांधी यांनी 1998 मध्ये आसामविरुद्ध खेळताना 323 धावांची खेळी केली होती.
आयसीसीने घातलेल्या बंदीबद्दल कागिसो रबाडा म्हणाला…
वाचा👉https://t.co/PEnmjpONyC👈#म #मराठी #Cricket #SAvENG @KagisoRabada25— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020
टीम इंडियाला मोठा धक्का! हा मोठा खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यातील टी२० मालिकेतून बाहेर
वाचा👉https://t.co/MvmF8ujdSS👈#म #मराठी #Cricket #TeamIndia @SDhawan25— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020