भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या कोसटीत मात्र अडचणींचा सामना करावा लागला. इंदोर कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ सर्वबाद झाला. पण यादरम्यान भारताचा माजी उपकर्णधार विराट कोहली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव (Umesh Yadav) याला बऱ्याच दिवसांनंतर भारतीय संघासाठी खेळम्याची संधी इंदोर कसोटीत मिळाली. डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मिरपूर कसोटीत उमेश भारतासाठी खेळला होता. त्यानंतर थेट त्याने मार्च महिन्यात संघात पुनरागमन केले. इंदोरमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली, खरी पण खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे दिसते. असात वेगवान गोलंदाज यादव याठिकाणी काय कमाल करणार हे पाहण्यासारखे असेल. पण गोलंदाजीला येण्यापूर्वी त्याने फलंदाजीतून संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न केला.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण फलंदाजांना झटपट विकेट्स गमावल्यानंतर उमेश यादवलाही फलंदाजी करावी लागली. यादवने 13 चेंडूत 17 धावा केल्या. यात यादवच्या दोन जबरदस्त षटकारांचाही समावेश होता. स्वतःचा दुसरा षटकार यादवने युवा टॉड मर्फीने टाकेलल्या 31व्या षटकात मारला. मर्फीने हा चेंडू गेल स्टंपकडे टाकला, ज्यावर यादवने गुडघा खाली टेकवून अप्रतिम षटकार मारला. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये बसलेला विराट कोहली () कॅमेऱ्यात कैद झाला. यादवचा हा षटकार पाहून विराटने स्वतःची खुर्ची सोडली होती. विराटचा हा भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी संघातील इतर खेळाडूंकडूनही यादवला समर्थन मिळाले.
https://twitter.com/javedan00643948/status/1630829712955305984?s=20
https://twitter.com/javedan00643948/status/1630828987055501312?s=20
दरम्यान, उमेश यादवने या षटकारानंतर एका खास विक्रमात विराटची बरोबरी केली. भारतीय संघासाठी सर्वाधिक कसोटी षटकार मारणाऱ्यांमध्ये यादवने युवराज सिंग (22) आणि रवी शास्त्री (22) यांना मागे टाकले. यादीत सद्या विराट कहोली आणि यादव प्रत्येकी 24 षटकारांसह बरोबरीवर आहेत. सामन्याच्या एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या 109 धावांवर सर्वबाद झाला. दिल्ली कसोटीतून स्वतःच्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमन याने अवघ्या 16 धावा खर्च करून 5 विकेट्स घेतल्या. दिग्गज फिरकीपटू नाथन लायनला तीन, तर टॉड मर्फीला एक विकेट मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी प्रतिष्ठा घेऊन आलेला ऑसी फलंदाज ठरला जड्डूसमोर खोटा! आत्तापर्यंत इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता
मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची धुरा ‘या’ दिग्गजाच्या हाती, आता रोहितप्रमाणे तीही लावणार विजेतेपदांची रांग