Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इंदोरच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत होता ऑस्ट्रेलियन दिग्गज, शास्त्रींनी दोन शब्दात केले शांत

इंदोरच्या खेळपट्टीवर नाराजी व्यक्त करत होता ऑस्ट्रेलियन दिग्गज, शास्त्रींनी दोन शब्दात केले शांत

March 1, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ravi Shastri Admired Indian Youngsters

Photo Courtesy: Twitter/ICC


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना बुधवारी (1 मार्च) इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाला तिसऱ्या कसोटीत विजय सोपा दिसत नाहीये. सामन्याच्या पहिल्याच दिवशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे दिसले. परिणामी भारतीय संघ स्वस्तात सर्वबाद झाला. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन यांनी नाराजी व्यक्त केली. पण भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दोन शब्दात हेडनला प्रत्युत्तर दिले.

इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळाले. माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) यांच्या मते सामान्यतः सामन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मिदत करताना दिसते. पण या सामन्यात पहिल्याच दिवसापासून फिरकी गोलंदाज खेळपट्टीचा फायदा घेताना दिसत आहेत. भारतीय संघ अडचणीत असला तरीही हेडनने खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली. पहिल्या दिवसी सहाव्या षटकातच ऑस्ट्रेलिया चेंडू फिरकी गोलंदाजांच्या हातात सोपवला होता आणि कर्णधार स्टीव स्मिथ (Steve Smith) याचा हा निर्णय अगदी योग्य ठरला. भारताने प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 109 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या. हेडन आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक यावेळी लाईव्ह समालोचन करत होते.

खेळपट्टीची अपस्था पाहून हेडन म्हणाले, “भारताच्या कॅम्पमध्ये शांती दिसत आहे. कारण त्यांनी मागच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. याठिकाण चेंडू सरासरी किती टर्न होतोय, यावर जरा नजर टाका. त्यामुळे मला अशा परिस्थितीतील सामना आवडत नाही. कारण दुसरीकडे कुठेच तुम्ही फिरकी गोलंदाजांना सहाव्या षटकात गोलंदाजीला बोलवत नाही. इंदोर कसोटीत चेंडू सरासरी 4.8 डिग्री टर्न होत आहे. हा टर्न खूपच जास्त आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसी अशी अपेक्षा असते. फलंदाजांनाही खेळण्याची संधी मिळाली पाहिजे.”

“रवी शास्त्री कसोटीमधील तुमच्या खेळाडूंच्या प्रदर्शनाचा आढावा घ्या. पहिला आणि दुसरा दिवस फलंदाजांसाठी हवा होता, असे वाटत नाही का?,” असा प्रश्न हेडनने रवी शास्त्री (Ravi Shastri ) यांना विचारला. यावर शास्त्रींनी अगदी दोन शब्दात उत्तर दिले की, “होम कंडिशन्स.” काही वेळ शांत राहिल्यानंतर शास्त्री म्हणाले की, “तसे पाहिले तर याठिकाणची परिस्थिती होम कंडिशन्सपेक्षाही वेगळी आहे. याठिकाणी फलंदाजांना अडचणी येतील. पण एका चांगल्या भागीदारीनेही फरक पडू शकतो.” (Ravi Shastri gives two-word reply to Mathew Hayden who expressed displeasure at Indore’s pitch)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्यांची आघाडी! ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंविरूद्ध टीम इंडियाचे लोटांगण, ख्वाजाचे अर्धशतक
ऑस्ट्रेलियाच्या नाकी नऊ आणणाऱ्या पंतची अपघाताच्या 2 महिन्यांनंतर मोठी प्रतिक्रिया; काय म्हणाला वाचाच


Next Post
Ravindra-Jadeja

मोठी प्रतिष्ठा घेऊन आलेला ऑसी फलंदाज ठरला जड्डूसमोर खोटा! आत्तापर्यंत इतक्या वेळा दाखवला तंबूचा रस्ता

Team-India-Women

मुंबई इंडियन्सच्या महिला संघाची धुरा 'या' दिग्गजाच्या हाती, आता रोहितप्रमाणे तीही लावणार विजेतेपदांची रांग

Virat Kohli

उमेश यादवने स्वतःच्या विक्रमाची बरोबरी करूनही विराटकडून फूल सपोर्ट, षटकार मारल्यानंतरचा व्हिडिओ व्हायरल

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143