---Advertisement---

माझ्या या यशामागे फेडरर, नदालचा महत्त्वाचा वाटा- नोवाक जोकोविच

---Advertisement---

१४वे ग्रॅंड स्लॅम जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचने रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांना युएस ओपनच्या विजयाचे श्रेय दिले आहे.

युएस ओपनचे तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकणाऱ्या जोकोविचने म्हटले, “या दोघांसोबत खेळल्याने माझ्या कामगिरीवर चांगला परिणाम झाला. आज मी जे काही आहे ते या दोघांमुळेच.”

यावेळी जोकोविचने अंतिम सामन्यात मार्टीन जुआन डेल पोट्रोला ६-३, ७-६ (७-४), ६-३ असे पराभूत केले.

https://twitter.com/usopen/status/1038940803064770560

“फेडररला मी गुरू मानत असून लहानपणी त्याचा विम्बल्डनमधील सामना पाहून मला टेनिसची आवड निर्माण झाली” असे जोकोविच म्हणाला.

“त्याने जिंकलेल्या ग्रँड स्लॅमची बरोबरी करण्यासाठी मला अजून खूप काही शिकायचे आहे”, असे जोकोविच म्हणाला. सार्वकालिन ग्रँड स्लॅममध्ये त्याच्या पुढे फेडरर २० आणि नदाल १७ हे दोघे आहेत.

हाताच्या कोपऱ्याला झालेल्या दुखापतीमुळे जोकोविचची एटीपी क्रमवारी घसरली होती. मात्र यावर्षी पुनरागमन करताना त्याने विम्बल्डन आणि सिनसिनाटी मास्टर्सचे विजेतेपद जिंकले. ताज्या एटीपी क्रमवारीत तो सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने २०११ आणि २०१५ ला यूएस ओपनचे विजेतेपद जिंकले होते.

या स्पर्धेत फेडरर उपांत्यपूर्व फेरीतून जॉन मिलमनकडून पराभूत झाला होता तर नदाल उपांत्य फेरीत डेल पोट्रो विरुद्ध खेळताना त्याच्या गुडघ्याच्या दुखपतीने डोके वर काढले

या स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात येथील हवामानाचा त्रास जाणवू लागला. या परिस्थितीत जोकोविचने ४१वे मानांकन असणाऱ्या हंगेरियन मार्टोन फुस्कोविक्सला नंतर ६१वे मानांकन असलेला अमेरिकन टेनीज सॅंडग्रेनला पिछाडले.

फ्रान्सच्या रिचर्ड गॅस्कुट, पोर्तुगलचा जोआओ सोउसा, मिलमन आणि २०१४च्या अंतिम फेरीत पोहचलेल्या जपानच्या केइ निशिकोरीला सरळ सेटमध्ये पराभूत करत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला.

या सामन्यात स्टेडियममध्ये चाहते २००९चा विजेता डेल पोट्रोला प्रोत्साहन देत होते.

“त्याने उत्तमच खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये तर आम्ही काही वेळेस बरोबरीतच होतो. जेव्हा प्रेक्षक ओल ओल असे ओरडत होते तेव्हा मला वाटले ते नोलच म्हणत असतील कारण माझे संक्षिप्त नाव नोल आहे”, असेही तो पुढे म्हणाला.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

जेम्स अँडरसन बनला कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज

२०१९ मध्ये आयपीएल जाणार भारताबाहेर?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment