---Advertisement---

जोकोविचचा स्वप्नभंग, ऑस्ट्रेलियन ओपन 2026चा विजेता ठरला कार्लोस अल्काराझ

On: रविवार, फेब्रुवारी 1, 2026 5:34 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया ओपन 2026च्या पुरूष एकेरीच्या अंतिम फेरीत स्पेनच्या कार्लोस अल्काराझने सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा 2-6, 6-2, 6-3, 7-5 असे पराभूत केले. याचबरोबर हे कार्लोसचे त्याच्या कारकिर्दीतील पहिले ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅंड स्लॅम्स ठरले. त्याबरोबरच त्याचे करियर ग्रॅंड स्लॅम्सही पूर्ण केले.

याआधी अल्काराझने फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि युएस ओपनचे प्रत्येकी दोन ग्रॅंड स्लॅम्स जिंकले आहेत. त्याचे केवळ ऑस्ट्रेलिया ओपन जिंकण्याचे स्पप्न बाकी होते. ते आता जिंकल्याने त्याने करियर ग्रॅंड स्लॅम्सही पूर्ण केले आहे.

हा सामना 3 तास 2 मिनिटे चालला. या विजयानंतर अल्काराझने अनेक विक्रमही केले आहेत. 22 वर्षीय अल्काराझने अमेरिकेच्या डॉन बज्डचा 1938 फ्रेंच ओपन स्पर्धेतील विक्रम मोडला. त्यांनी वयाच्या 23व्या वर्षी करियर ग्रॅंड स्लॅम्स जिंकले होते. तसेच तो ओपन इरामध्ये एकेरीत सात ग्रॅंड स्लॅम्स जिंकणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला आहे.

दिग्गज टेनिसपटू स्पेनचा राफेल नदालनेही या सामन्याला उपस्थिती दाखवली. जोकोविचही 2023च्या युएस ओपननंतर महत्वाच्या फेरीत पोहोचल्याने त्याने कारकिर्दीला साजेसा खेळ करण्याचा प्रयत्न केला, त्याने पहिला सेट 2-6 असा जिंकला. नंतरच्या दोन सेटमध्ये अल्कारझचा खेळ उत्तम ठरला असून जोकोविचने केलेल्या चुका दहा वेळेच्या ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्याला महाग पडल्या.

सलग दोन सेट जिंकत अल्काराझ आघाडीवर होता. चौथ्या सेटमध्ये 5-6 अशी स्थिती असताना अल्काराझने वर्चस्व राखत 24 स्ट्रोकची ती रॅली जिंकली आणि चॅम्पियन ठरला. करियर ग्रॅंड स्लॅम्स पूर्ण करणारा अल्काराझ केवळ नववा पुरूष टेनिसपटू ठरला आहे.

यामुळे जोकोविच विरुद्ध अल्काराझ समीकरण सध्यातरी 5-5 असे बरोबरीत आले आहे. या सामन्याआधी हे दोघे 9 वेळा समोरा-समोर आले होते. त्यामध्ये पाच वेळा जिंकत जोकोविच आघाडीवर होता. त्याचबरोबर त्याचे 11वे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याचे स्वप्नही अधुरे राहिले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---