fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

धोनीची जागा कोणताही खेळाडू घेऊ शकत नाही, दिग्गज खेळाडू कडाडला

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी यष्टीरक्षक आणि कर्णधार ठरलेल्या एमएस धोनीला विंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या टी-20 सामन्याच्या संघातून वगळ्याने जोरदार चर्चा सुरू आहे. या एक वर्षातील त्याची वन-डेमधील कामगिरी बघता फलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला आहे. यामुळे सगळीकडून त्याच्यावर टिका होत आहे.

मात्र विराट कोहलीच्या मते, ‘धोनी हा भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे’. आता याच  वक्तव्यला माजी भारतीय गोलंदाज आणि धोनीचा संघसहकारी असलेल्या आशिष नेहराने दुजोरा दिला आहे.

“संघामध्ये रिषभ पंत, दिनेश कार्तिक आहे. त्यांनी योग्य कामगिरीही केली आहे. मात्र धोनीसारखा हा धोनीच आहे. त्याच्यासारखा क्रिकेटर मिळणे अशक्य आहे. त्याने विराट कोहली, युजवेंद्र चहल, कुलदिप यादव, जसप्रीत बुमराह यांना त्यांच्या कारकीर्दीत मार्गदर्शन केले आहे”, असे नेहरा म्हणाला.

यष्टीरक्षक म्हणून धोनीने यावर्षी उत्कृष्ठ कामगिरी केली मात्र फलंदाजीत तो मागे राहिला. 2018मध्ये भारतीय संघ 20 वन-डे सामने खेळला. यातील 20 पैकी 20 सामने खेळणारा धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू. यात त्याला 13 सामन्यांत फलंदाजीची संधी मिळाली. यावेळी त्याला फक्त 275 धावा करता आल्या होत्या.

तसेच धोनीने यावर्षी फक्त दोनच षटकार मारले असून चौकार मारण्यासही त्याने अधिक चेंडू घेतले आहे.

नेहराप्रमाणेच भारतीय दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही धोनीला संघात न घेतल्याचे आश्चर्य व्यक्त केले आहे.

“संघ निवडताना निवड समिती काय विचार करत होते हे सांगणे कठीण आहे. पण कर्णधार, प्रशिक्षक, आणि संघ निवडणारे अधिकारी यांच्यात काय चर्चा झाली हे त्यांच्यातच राहणे योग्य आहे”, असे सचिन म्हणाला.

उद्यापासून (4 नोव्हेंबर) संध्याकाळी 7 वाजता सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध विंडीजमध्ये पहिला  टी-20 सामना कोलकातामध्ये होणार आहे.

असा आहे 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या विंडीज विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा(कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, कृणाल पंड्या, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, शहाबाज नदीम.

महत्त्वाच्या बातम्या:

विराटला रोहितच ठरतोय सरस.. जाणुन घ्या काय आहे कारण

टीम इंडियासोबतचे ते प्रकरण सायमंड्सला चांगलेच भोवले…झाला व्यसनी

You might also like