चेन्नई सुपर किंग्सचा स्टार अष्टपैलू शार्दुल ठाकूरला वाढदिवसाच्या एक दिवस आधी मोठी भेट मिळाली. इंडियन प्रीमीयर लीगमध्ये तो प्रतिनिधित्व करत असलेल्या त्याचा संघ चेन्नई सुपर किंग्सने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आयपीएलच्या २०२१ हंगामातील अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. या विजयासह चेन्नईने आपले चौथे आयपीएल जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे १६ ऑक्टोबरला शार्दुलला वाढदिवस असल्याने विजेतेपदाच्या जल्लोषानंतर ड्रेसिंग रूममध्ये त्याचा जबरदस्त वाढदिवस साजरा करण्यात आला.
चेन्नईने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो केक कापताना दिसत आहे. केक कापल्यानंतर संपूर्ण संघाने त्याला केकने माखवलं आहे. शार्दुलचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील पालघर येथे झाला. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सदस्य आहे. त्याने ४ षटकांत ३८ धावा देऊन ३ विकेट घेत अंतिम फेरीत संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली.
Go Shardhool… It's your B'day! 🎂#SuperBirthday #WhistlePodu #Yellove 🦁💛 @imShard pic.twitter.com/K4IzsojkQ7
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) October 15, 2021
आयपीएल २०२१ नंतर तो आता टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघासोबत खेळताना दिसेल. टी२० विश्वचषकासाठी निवडलेल्या मुख्य संघात त्याची अक्षर पटेलच्या जागी निवड झाली आहे.
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सीएसकेकडून डू प्लेसिसने शानदार ८६ धावांची खेळी करत सात चौकार आणि तीन षटकार लागावले. त्याला ऋतुराज गायकवाड (३२), रॉबिन उथप्पा(३१) आणि मोईन अली (३७*) यांची चांगली साथ लाभली. त्यामुळे सीएसकेने २० षटकांत १९२ धावांची मोठी मजल मारली.
त्यानंतर, फलंदाजीला उतरलेल्या केकेआरला १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकांत ९ बाद १६५ धावाच करता आल्या. केकेआरकडून केवळ शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यरने अर्धशतके करत झुंज दिली. मात्र, अन्य कोणतेच फलंदाज फार काही करु शकले नाही. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने उत्तम गोलंदाजी करताना ३८ धावांच्या मोबदल्यात तीन गडी बाद केले. त्यामुळे चेन्नईने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
चेन्नईने यापूर्वी २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये विजेतेपद पटकावले होते, तर केकेआर २०१२ आणि २०१४ मध्ये विजेतेपद पटकावले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
प्रतिस्पर्धी असूनही ‘त्या’ प्रसंगानंतर धोनीने त्रिपाठीची थोपटली पाठ, कारण ऐकून छाती अभिमानाने फुगेल
आपल्या षटकारांनी प्रेक्षकांना नेहमीच आभाळाकडे पाहायला लावणारे ५ धुरंधर; अव्वलस्थानी ‘हा’ पठ्ठ्या
चेन्नईच्या प्रशिक्षकाचा मुंबईच्या प्रशिक्षकाला धोबीपछाड; फ्लेमिंगच्या नावे नवा आयपीएल विक्रम