भारतीय संघाने दक्षिण अफ्रिका दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात विजय (sa vs ind first test) मिळवला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी दक्षिण अफ्रिका संघ लक्ष्यापासून ११३ धावांच्या अंतरावर असताना सर्वबाद झाला आणि भारताने विजय मिळवला. या विजयासह भारताने कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ने पहिल्या सामन्यातील विजयानंतर खास प्रतिक्रिया दिली आहे. विराटने सांगितल्याप्रमाणे भारतीय संघाने सामन्यात चांगले प्रदर्शन केले.
दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या या पहिल्या कसोटी सामन्यात पावसाने अडथळा निर्माण केला होता. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने चांगल्या खेळीचे प्रदर्शन केले. पहिल्या दिवशी भारताने तीन विकेट्सच्या नुकसानावर २७२ धावा केल्या होत्या. परंतु दुसऱ्या दिवशी पाऊस आल्यामुळे संपूर्ण दिवसात एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नव्हता. अशात एक दिवसाचा खेळ रद्द झाल्यामुळे चार दिवसांमध्ये विजय मिळवणे गरजेचे होते. भारताने मात्र हे आव्हान पार केले आणि चार दिवसात दक्षिण अफ्रिकेच्या २० विकेट्स घेऊन दणदणीत विजय मिळवला.
पहिल्या सामन्यातील विजयानंतर विराट म्हणाला की, “आम्ही तशी सुरुवात करण्यात यशस्वी राहिलो, जी अपेक्षित होती. चार दिवसात परिणाम मिळाल्यामुळे समजते की, आम्ही किती चांगला खेळ दाखवला. आमच्यासाठी दक्षिण अफ्रिका नेहमीच अवघड जागा राहिली आहे. असे असले तरी, आम्ही बॅट आणि चेंडूने मैदानात उत्कृष्ट प्रदर्शन केले.”
Scenes from Centurion 👌https://t.co/Z3MPyesSeZ goes behind the scenes post #TeamIndia's historic win at SuperSport Park 🏟️🙌
Full video coming up soon 📽️ – Stay tuned ⏳#SAvIND pic.twitter.com/oKyGhm0MxF
— BCCI (@BCCI) December 30, 2021
सामन्यात एक दिवसाचा खेळ पूर्णपणे रद्द झाला असला, तरी भारतीय संघाने शेवटच्या दिवशी जवळपास दोन सत्रांचा खेळ शिल्लक असताना विजय मिळवला. एकंदरित पाहता भारताने साडे तीन दिवसांमध्ये पहिला कसोटी सामना जिंकला. भारतीय संघाची ही कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे.
हेही वाचा- बाबा विराटला चीयर करण्यासाठी पहिल्यांदाच वामिका स्टेडियममध्ये, आई अनुष्कासोबत कॅमेरात कैद
दरम्यान, भारतीय कर्णधार विराटने या सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३२७ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात १९७ धावा केल्या. पहिल्या डावात आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघ स्वस्तात सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात भारताने अवघ्या १७४ धावा केल्या. तरीदेखील दक्षिण अफ्रिकेला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या डावात ३०५ धावांची आवश्यकता होती. शेवटच्या डावात दक्षिण अफ्रिका संघ १९१ धावा करून सर्वबाद झाला आणि भारताने ११३ धावांनी विजय मिळवला.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: ‘यू मुंबां’चा ‘पिंक पँथर्स’ला पराभवाचा दणका, ३७-२८ च्या मोठ्या फरकाने जिंकला सामना
ऋतुराजची ४ शतके ते धवनची अष्टपैलू कामगिरी, विजय हजारे ट्रॉफी २०२१ मध्ये बनले ‘हे’ ६ अद्वितीय विक्रम
व्हिडिओ पाहा –