पुणे: मंदार वाकणकर टेनिस अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली अरूण वाकणकर मेमोरियल करंडक पुरूष टेनिस 2018 स्पर्धेत पुरुष खुल्या गटात ओंकार अग्निहोत्री, रोहित शिंदे, अंशूल सातव या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना कोर्टवर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात पहिली फेरीत ओंकार अग्निहोत्रीने पृथ्वीराज पाटीलचा 6-3 असा तर, अजय चौहानने जगदीश सुंदरचा 6-4असा संघर्षपूर्ण पराभव केला.
अव्वल मानांकित रोहित शिंदे याने प्रांजल देशपांडेचा 6-0असा सहज पराभव केला. करण थरानीने अमित शर्मावर 6-1असा विजय मिळवला.अंशूल सातवने मंदार मेंसगीला 6-4असे पराभूत केले. सौतिक घोष याने ज्ञानेश्वर पाटीलचा 6-2असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
हौशी गटात विवेक खडगे, ब्रुनो रुबिनो, अमित शर्मा, आर्यन हूड, अभिषेक सिंग, अभिषेक चव्हाण, प्रदीप बेपारी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली. स्पर्धेचे उदघाटन गेम ऑन ईव्हेंटस्चे सुनिल लुल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक मंदार वाकणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: हौशी गट: दुसरी फेरी:
विवेक खडगे वि.वि.सी कुमार 6-5(7-1);
ब्रुनो रुबिनो वि.वि.डॉ.राम नायर 6-3;
अमित शर्मा वि.वि.अक्षय पाटील 6-2;
आर्यन हूड वि.वि.संजय आशर 6-0;
सौतिक घोष वि.वि.शिव आशिष 6-2;
अभिषेक सिंग वि.वि.विवेक जोशी 6-0;
अभिषेक चव्हाण वि.वि.आदित्य सोंडकर 6-0;
प्रदीप बेपारी वि.वि.गजानन कुलकर्णी 6-3;
पुरुष एकेरी गट: पहिली फेरी:
ओंकार अग्निहोत्री वि.वि.पृथ्वीराज पाटील 6-3;
अजय चौहान वि.वि.जगदीश सुंदर 6-4;
रोहित शिंदे(1)वि.वि.प्रांजल देशपांडे 6-0;
करण थरानी वि.वि.अमित शर्मा 6-1;
अंशूल सातव वि.वि.मंदार मेंसगी 6-4;
सौतिक घोष वि.वि.ज्ञानेश्वर पाटील 6-2.








