भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याचा चाहतावर्ग मोठा आहे. सॅमसनने 2015 साली भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पण अध्याप त्याला भारताकडून खेळण्याच्या जास्त संधी मिळाल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर संघ व्यवस्थापन आणि निवडकर्ते यांच्यावर नेहमीच टीका होत आली आहे. आगामी आयपीएल हंगामात सॅमसन चाहत्यांना राजस्थान रॉयल्स संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तत्पूर्वी सराव सत्रातील त्याचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगाम 31 मार्च रोजी सुरू होणार आहे. म्हणजेच अवघ्या काही दिवसांमध्ये राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) या हंगामातील पहिला सामना खेळायचा आहे. राजस्थान संघाचा कर्णधार सॅमसन आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका आजपर्यंत बजावत आला आहे. आगामी हंगामात देखील संजू सॅमसन (Sanju Samson) याची बॅठ आग ओकताना दिसू शकते. सॅमसन आपली आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्ससाठी तयारीला लागला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत त्याने एका फिरकी गोलंदाजाची चांगलीच धुलाई केल्याचे दिसते. मोठे शॉट्स खेळण्यासाठी सॅमसन पायाचा अप्रतिम उपयोग करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
दरम्यान, सॅननने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळला होता. या मालिकेदरम्यान त्याला दुखापत झाली आणि त्याने संघातून माघार घेतली. दुखापतीनंतर यातून सावरण्यासाठी सॅमसन बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दाखल झाला अजूनही भारतासाठी पुनरागमन करू शकला नाहीये. असे असले तरी, आगामी आयपीएल हंगामासाठी त्याने कंबर कसल्याचे दिसत आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स 2 एप्रिल रोजी आपला पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळेल. आयपीएल 2023 पूर्वी झालेल्या मिनी लिलावात राजस्थान संघाने जो रूट, मुरुगन अश्विस, जेसन होल्डर, एडम जम्पा अशा खेळाडूंना ताफ्यात सामील केले आहे.
#SanjuSamson training ahead of the upcoming IPL 2023🔥
©️ IG@/super__samson_ pic.twitter.com/C9vczXA0hr
— Sanju Samson Fans Page (@SanjuSamsonFP) March 19, 2023
आगामी आयपीएल हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघ
मिनी लिलावात खरेदी केलेले खेळाडू : जेसन होल्डर (5.75 कोटी रुपये), एडम जम्पा (1.5 कोटी रुपये), जो रूट (1 कोटी रुपये), डोनोवन फरेरा (50 लाख रुपये), केएम आसिफ (30 लाख रुपये), अब्दुल पीए (20 लाख रुपये), आकाश वशिष्ठ (20 लाख रुपये), मुरुगन अश्विन (20 लाख रुपये), कुणाल राठौर (20 लाख रुपये).
रिटेन केलेले खेळाडू : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शिमरोन हेटमायर, देवदत्त पडिक्कल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बाउल्ट, ओबेड मेकॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, केसी करियप्पा.
(Ahead of IPL 2023, Sanju Samson batted well in the nets)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मालिका विजयासाठी तिसरा वनडे सामना निर्णायक, कर्णधार रोहितच्या नावावर होणार मोठा विक्रम
कॅलिस-टेलवर भारी पडली दिलशान-थरंगाची जोडी! आफ्रिदीच्या आशिया लायन्सने जिंकली लिजेंड्स लीगची ट्रॉफी