---Advertisement---

‘मी अस ऐकलंय की, ही धोनीची शेवटची आयपीएल आहे…’, कॅप्टन कूलविषयी काय म्हणाला शेन वॉटसन?

Shane-Watson
---Advertisement---

ऑस्ट्रेलियन दिग्गज अष्टपैलू शेन वॉटसन याला एमएस धोनीच्या नेतृत्वात खेळण्याचा अनुभव आहे. वॉटसन धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्वाचा भाग राहिला आहे. असात हे दोघे एकमेकांना चांगले ओळखतात. आगामी आयपीएल हंगाम धोनीसाठी शेवटचा, असे असे बोलले जात आहे. पण वॉटसनला मात्र तसे वाटत नाही. शेन वॉटसनच्या मते धोनी आयपीएलचे अजून काही हंगाम खेळू शकतो. त्याने धोनीच्या फिटनेसचे कौतुक देखील यावेळी केली.

एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज संघ चार वेळा आयपीएल चॅम्पियन बनला. धोनीमुळे सीएसके आयपीएलमध्ये सध्या दुसरा सर्वात यशस्वी संघ आहे. पण आगामी आयपीएल हंगामानंतर 41 वर्षीय धोनी निवृत्ती जाहीर करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मागच्या काही हंगामांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू आहेत. पण त्याने म्हटल्याप्रमाणे तो आपले होम ग्राउंड चेन्नईमध्ये यावर्षी निवृत्ती घेऊ शकतो. मागच्या दोन आयपीएल हंगामांमध्ये कोरोनाच्या कारणास्तव विदेशात झाल्याने तसे होऊ शकले नाही.

शेन वॉटसन (Shane Watson) सद्या लिजेंड्स लीग क्रिकेट खेळत आहे. यादरम्यान त्याने धोनीच्या आयपीएल खेळण्याविषयी आपले मत मांडले. वॉटसन म्हणाला की, “मी असे ऐकले आहे की, धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम आहे. माझ्या मते धोनी पुढे तीन, चार वर्ष खेळू शकतो. तो अजूनही खूप फिट आहे. तो खरोखर चांगली फलंदाज आणि यष्टीरक्षण करत आहे. तो एक चांगला कर्णधार आहे. सीएसकेला मिळालेल्या यशामध्ये धोनीची भूमिका सर्वात महत्वाची आहे.”

दरम्यान, माध्यमांमध्ये अशा काही बातम्याही समोर आल्या आहेत, ज्यामध्ये धोनी आगामी आयपीएल हंगाम संपल्यानंतर सीएसकेच्या सपोर्ट स्टाफमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले गेले आहे. असे झाले तर सीएसके चाहत्यांना धोनी आयपीएलमधून निवृत्तीनंतर देखील मैदानात दिसू शकतो. निवृत्तीनंतर धोनी शक्यतो सीएसकेच्या मेंटॉरच्या भूमिकेत दिसू शकतो.
(MS Dhani can play three, four more IPL seasons, says Shane Watson)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
महिंद्रा IBA महिला बॉक्सिंग: भारताच्या निखत झरीन आणि मनिषा उप-उपउपांत्यपूर्व फेरीत
तोच दरारा तीच दहशत! 42 व्या वर्षी हवेत झेपावत कैफने टिपला नेत्रदीपक झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ   

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---