आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम संपून काही दिवस झाले आहेत. तोपर्यंतच आयपीएलच्या पुढच्या हंगामाची चाहत्यांना आतुरता लागली आहे. आयपीएल 2025पूर्वी मेगा लिलाव होणार आहे. या लिलावामध्ये कोणता संघ किती खेळाडू रिटेन करणार? किती रिटेंशन पर्याय एका संघाला मिळणार? यावर देखील चाहत्यांच लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी यासंदर्भात बीसीसीआय आणि आयपीएलच्या संघांचे मालक यांच्यामध्ये (31 जुलै) रोजी बैठक होणार आहे.
क्रिकबझच्या अहवालानुसार, आयपीएलचे सीईओ (CEO) हेमांग अमीन यांनी एका टेक्स्ट मेसेजद्वारे माहिती दिली आहे की, आयपीएल रिटेंनशन आणि आरटीएम (RTM) संदर्भात (31 जुलै) रोजी बैठक होणार आहे. या सभेचे ठिकाण आणि वेळ लवकरच कळविण्यात येईल, असेही संदेशात सांगण्यात आलं आहे.
तत्पूर्वी, संघांचा दृष्टिकोन असे सूचित करतो की संघ टिकवून ठेवण्यासाठी 5-6 खेळाडू संघात राखणं पुरेसं आहे. हा दृष्टिकोन देखील लिलावामध्ये स्पर्धात्मक राहण्याची शक्यता आहे. याशिवाय राईट टू मॅच (RTM) पर्याय हा देखील मुद्दा आहे ज्यावर बैठकीत चर्चा होऊ शकते. मात्र, बीसीसीआयनं याबाबत आधीच निर्णय घेतला असू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
या 2 स्टार्सपैकी कोणाला प्लेइंग 11 मध्ये स्थान? श्रीलंकेमालिकेपूर्वी हेड कोच गंभीरसमोर मोठे आव्हान
“धोनीचं नाव कधी ऐकलं नाही” इंग्लंडमधील स्पोर्ट्स कंपनीच्या वक्तव्यानं चाहत्यांमध्ये उडाली खळबळ
अर्शदीप सिंगचं नशीब उजळलं, निवडकर्ते देणार कसोटी मालिकेत मोठी संधी?