भारतीय क्रिकेट संघाचा माजी मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आयपीएलपूर्वी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. तसेच आयपीएलदरम्यान सामन्यामध्ये धोनी संघाचे कर्णधारपद एखाद्या खेळाडूकडे सोपवू शकतो, असे रायडूने म्हंटले आहे. याबरोबरच सीएसकेकडून खेळलेल्या रायुडूचे मत आहे की, भविष्य डोळ्यासमोर ठेवून माही हे करू शकतो जेणेकरून आगामी काळात चेन्नईसाठी नवीन कर्णधार तयार करता येईल.
याबरोबरच आयपीएलच्या 17व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी 22 मार्चला चेपॉकच्या मैदानावर होणार आहे. तसेच आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर धोनी या फॉरमॅटला रामराम ठोकेले अशीही शक्यता आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर धोनी या फॉरमॅटला रामराम ठोकेले अशीही शक्यता आहे.
याबाबत एका स्पोर्ट्स चॅनलशी बोलताना अंबाती रायुडू म्हणाला की, इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू असल्याने धोनी या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पुढे बोलताना तो म्हणाला आहे की, मला धोनीला फक्त कर्णधार म्हणून बघायचे आहे. धोनी केवळ 10 टक्के तंदुरुस्त असला तरी तो सर्व सामने खेळू शकतो.
दरम्यान, आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्रीमध्ये पदार्पण करताना दिसणार आहे. रायुडूने भारतासाठी 55 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि 6 टी-20 सामने खेळले. आयपीएलमधील अनेक हंगाम तो सीएसकेकडून खेळला. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी 2018 मध्ये झाली जेव्हा त्याने एकूण 602 धावा केल्या होत्या.
अशातच धोनी हा यावर्षी आयपीएल खेळणार की नाही, याबाबत संभ्रम होता. कारण गेल्या आयपीएलमध्ये धोनीला दुखापत झाली होती आणि ती गंभीर स्वरुपाची होती. त्याचबरोबर धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने जेतेपद पटकावले होते. त्यामुळे तो आता 2024 साली खेळणार नाही, असे म्हटले जात होता. आता आयपीएल सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वी धोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आणि या नवीन हंगामात आपण नवीन भूमिकेत दिसणार असल्याचे त्याने यामध्ये म्हटले होते.
महत्वाच्या बातम्या –
- देशात निवडणुका असल्या तरीही IPL 2024 भारतातच होणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा ‘मास्टर प्लॅन’
- खराब खेळपट्टीमुळंच भारतीय संघानं वर्ल्डकप गमावला? अन् माजी दिग्गज खेळाडूने रोहित आणि द्रविडवर केले आरोप