वेस्ट इंडीज दौरा संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर आहे. आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका संपल्यानंतर आशिया चषकात संघाला आपली चमक दाखवावी लागणार आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पराभवामुळे हार्दिक पंड्या आणि राहुल द्रविड यांच्यावर जोरदार टीका झाल्या होत्या. अशातच आता द्रविड आणि जय शहा यांच्यातील भेटीबाबत नवी माहिती समोर येत आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघाची कामगिरी सुमार पाहायला मिळाली. कसोटी आणि वनडे मालिकेत भारताला विजय मिळाला. पण टी-20 मालिकेत संघावर नामुष्की ओढावली. टी-20 मालिकेतील पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्यावर टीका होताना दिसल्या. आगामी वनडे विश्वचषकानंतर द्रविडचा मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ संपणार आहे. अशात विश्वचषक जिंकण्यासाठी प्रशिक्षकांकडूनही पूर्ण प्रयत्न केले जातील. माध्यमांतील वृत्तांनुसार वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान द्रविड आणि बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) अमेरिकेत भेटले होते.
टी-20 मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत आयोजित केले होते. दुसरीकडे याचदरम्यान जय शहा आपल्या वैयक्तिक कारणास्तव अमेरिकेत असल्याचे सांगितले गेले आहे. क्रिकेबजच्या माहितीनुसार शाह ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्याठिकाणी त्यांनी द्रविडला बोलावले. दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचेही सांगितले गेले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये शाह टीव्हीवर देखील दिसले होते.
द्रविड आणि शाह यांच्यातील ही बैठक इतर सर्वसाधारन बैठकींप्रमाणे म्हणता येणार नाही. आगामी आशिया चषक आणि वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये महत्वाची चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी, दोघांमध्ये झालेली चर्चा अद्याप बाहेर आली नाहीये. सपोर्ट स्टाफमध्ये बदल होण्याबाबत देखील दोघांमध्ये चर्चा झाली असू शकते. (Ahead of the Asia Cup and World Cup, Jay Shah had a two-hour discussion with Rahul Dravid)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी बॉटिंग ऑर्डर बदला! रोहित-विराटने ‘या’ क्रमांकावर खेळलं पाहिजे, शास्त्रींचा सल्ला
“मुले मुलांविरुद्ध खेळताना दिग्गज वाटतात”, गावसकरांची टीम इंडियावर खोचक टीका