UEFA सुपर कप चषकाचे विजेतेपद पटकावून मँचेस्टर सिटीने नवा इतिहास रचला आहे. अंतिम सामन्यात नियमन वेळेनंतर 1-1 अशा बरोबरीत संपलेल्या सामन्यात नंतर मँचेस्टर सिटीने सेव्हिलाचा 5-4 पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला. ( manchester city score victory over sevilla to win first UEFA Super Cup 2023 )
90 मिनिटांनंतर रोमांचक झालेला सामना 1-1 असा बरोबरीत असताना मँचेस्टर सिटीने पेनल्टी शूटआऊटमध्ये सेव्हिलाला 5-4 ने पराभूत करून इतिहासात प्रथमच यूईएफए सुपर कप जिंकला आहे.
मॅनेजर पेप गार्डिओला यांच्या कारकिर्दीत मॅन्चेस्टर सिटीने जिंकलेली ही 15वी ट्रॉफी होती. 2016 मध्ये सुरू झालेला हा विजयरथ आताही सुसाट धावत आहे. तसेच ह्या विजयासह कम्युनिटी शील्डमध्ये आर्सेनलकडून नुकत्याच झालेल्या पराभवाची मँचेस्चर संघाने भरपाई केली.