Rohit Sharma । हिटमॅनच्या नेतृत्वावर उपस्थित केला प्रश्न, माजी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकली. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव मिळाला. पण शेवटच्या चारही सामन्यांमध्ये यजमान संघाने इंग्लंडवरा पराभवाची धूळ चारली. रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने ज्या पद्धतीने प्रदर्शन केले, ते कौतुकास्पद होते. अनेकजन रोहितची तुलना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्याशी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ याने मोठी प्रतिक्रिया दिली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना धरमशालेत खेळला गेला. भारताने हा सामना एक डाव आणि 64 धावांनी जिंकला. पहिल्या डावात इंग्लंड संघ 218 धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 477 धावांची खेळी केली. 259 धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्यांदा फलंदाजीच करावी लागली नाही. कारण इंग्लंड संघ दुसऱ्या डावात अवघ्या 195 धावांवर सर्वबाद झाला. रविचंद्रन अश्विनने या सामन्यात सर्वाधिक 9 विकेट्स नावावर केल्या. कसोटी मालिकेत यजमान संघाने 4-1 असा विजय मिळवला. मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) याची बेन स्टोक्स (Ben Stokes) सोबत तुलना केली जात आहे.
अशातच ग्रीम स्मिथ यानेही मत मांडले. ग्रीम स्मिथ रोहित आणि स्टोक्सच्या नेतृत्वगुणांवर म्हणाला, “रोहित शर्मा खूप चांगला खेळला. चुकिचा अर्थ घेऊ नका, पण मला नाही वाटत की, बेन स्टोक्सने खराब नेतृत्व केले. जर असे बोलले जात असेल, तर ते योग्य नाही. रोहित शर्मासाठी त्यांच्या गोलंदाजांनी खूप अप्रतिम कामगिरी केली.”
दरम्यान, ग्रीम स्मिथ म्हटल्याप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या या कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजांचे योगदान जबरदस्त राहिले. खासकरून फिरकीपटू गोलंदाजांनी पाहुण्यांचा घाम काढला. यशस्वी जयस्वाल याने मालिकेत सर्वाधिक 712 धावा कुटल्या. (Former South African captain Graeme Smith questioned Rohit Sharma’s captaincy)
महत्वाच्या बातम्या –
WPL 2024 : आरसीबीच्या प्लेऑफ खेळण्याच्या आशा अजूनही कायम, घ्या जाणून कसं आहे गणित
धमाकेदार कसोटी प्रदर्शनानंतर जयस्वालच्या वनडे पदार्पणाची मागणी, दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया