आयपीएल स्पर्धा 2024 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी संघांमध्ये बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मग ते कर्णधार असो की, इतर काही बाबी. मुंबई इंडियन्समध्ये यंदाच्या वर्षात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. तसेच आता रोहित दुसऱ्या कुठल्यातरी संघात जाऊ शकतो, अशी अटकळ कायम आहे. तर तो आयपीएल खेळणार नाही अशा अनेक गोष्टी सध्या समोर येऊ लागल्या आहेत. अशातच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी खेळाडू अंबाती रायुडूने रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
याबरोबरच या स्पर्धेच्या काही दिवस आधी मुंबई इंडियन्सला पाचवेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माकडून संघाचे कर्णधारपद हिसकावून हार्दिक पांड्याला नवा कर्णधार बनवण्यात आले होते. तेव्हापासून रोहित यापुढे मुंबईसाठी खेळणार नसल्याचा अंदाज लावला जात आहे. पण त्याआधी अंबाती रायडूने रोहित शर्माकडे एक इच्छा व्यक्त केली आहे.
रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार करण्याबाबत अंबाती रायुडू म्हणाला आहे की, “मला वाटते की मुंबईने या वर्षी थोडी घाई केली आहे. यावर्षी कर्णधारपद रोहितकडेच ठेवायला हवे होते. तसेच हार्दिकने या वर्षी खेळून पुढच्या वर्षी कर्णधारपद स्वीकारले असते तर बरे झाले असते. कारण रोहित अजूनही टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. मला वाटते की त्यांनी थोडी घाई केली आहे, परंतु त्यांना आणि त्यांच्या व्यवस्थापनाला माहित आहे की काय करायचे आहे.”
What if… Rohit Sharma in CSK?? 🧐‼️#RohitSharma #AmbatiRayudu #CSK #WhistlePodu #IPL2024 pic.twitter.com/YHZTlruGds
— Fast Live Line (@FastLiveLine) March 11, 2024
हार्दिक पंड्याबद्दल बोलताना रायुडू म्हणाला आहे की, “ हार्दिक गुजरात टायटन्सच्या सेटअपमधून मुंबईत आला आहे. त्यामुळे निश्चितपणे हे थोडे कठीण जाईल.” कारण गुजरात टायटन्सचा सेटअप थोडा वेगळा आहे. मुंबई इंडियन्सचा सेटअप वेगळा आहे. यापूर्वी तो मुंबईकडून खेळला आहे, पण कर्णधारपद भूषवलेले नाही. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणे सोपे नाही. संघात स्टार खेळाडूंचा भरणा आहे आणि त्यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत, त्यामुळे दडपण थोडे जास्त असेल. सगळ्यांना हाताळणं इतकं सोपं नसतं. हार्दिकसाठी ही एक चांगली संधी आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-