इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा सरफराज खान यंदाच्या आयपीएलचा भाग नाही. त्यामुळे त्याचे आयपीएलचा 17 वा हंगाम खेळण्याचे स्वप्न भंगले आहे. तसेच त्याला लिलावापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने त्याला रिलीज केले होते. यानंतर तो या संघाकडून खेळणार त्या संघाकडून खेळणार चर्चेनां ऊधाण आले होते. मात्र आता त्याला आय़पीएलचा 17 वा हंगाम खेळणे अतिशय कठीण झाले आहे.
याबरोबरच सर्फराज खानने भारतासाठी शानदार पदार्पण केले आहे. पण त्याने आयपीएलमध्ये पहिले 50 सामने खेळले असले तरी त्याची कामगिरी काही विशेष झाली नाही. गेल्या मोसमातही तो फ्लॉप ठरला होता. त्यामुळेच तो लिलावात विकला गेला नाही. आता त्याला कोणताही संघ आयपीएलसाठी घेऊ शकेल असा काही पर्याय शिल्लक आहे का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
सर्फराझ खान 20 लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह आयपीएल 2024 मध्ये सामील झाला होता, परंतु कोणत्याही फ्रँचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नव्हते. त्याच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने 50 सामन्यांमध्ये 22.50 च्या सरासरीने 585 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वाोच्च धावसंख्या 67 धावा आहे. 2019 चा मोसम त्याच्यासाठी सर्वोत्तम ठरला. त्या मोसमात त्याची सरासरी 45 होती आणि त्याच मोसमात त्याचे अर्धशतकही आले होते.
दरम्यान सर्फराझला क्रिकेटमध्ये ओळख मिळाली ती फक्त आयपीएलच्या माध्यमातून. 2019 च्या मोसमात त्याने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने 8 सामन्यात 180 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला पुरेशा संधी मिळाल्या नाहीत. दिल्ली कॅपिटल्सकडून दोन हंगाम खेळणाऱ्या सर्फराझने दिल्लीसाठी 10 सामन्यांत 144 धावा केल्या होत्या. यामुळे फ्रँचायझीने त्याला रिलीज केले, परंतु सर्फराझबद्दल चर्चा सुरू आहे की सीएसके किंवा केकेआर त्याला आपल्या संघात सामील करू शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये ‘अ’ गटात अहमदनगर संघ अपराजित
- एका वर्षात 2 आयपीएल? T20 ऐवजी T10 फॉरमॅट? बीसीसीआय मोठा बदल घडवण्याच्या तयारीत