---Advertisement---

IND vs ENG: रवींद्र जडेजाला खेळवू नका, ‘या’ खेळाडूला संधी द्या! ऑस्ट्रेलिया दिग्गजाचं धक्कादायक विधान

On: शनिवार, जून 28, 2025 10:58 PM
---Advertisement---

टीम इंडियाचा (Team india) अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) जगातील सगळ्यात उत्तम अष्टपैलू खेळाडूंमध्ये एक मानला जातो, पण इंग्लंडविरुद्ध मालिकेच्या पहिल्या सामन्यात त्याच्या कामगिरीमुळे खूपच निराशा झाली. पहिल्या डावात त्याने फक्त 11 धावा केल्या. तसेच 23 षटकं गोलंदाजी करूनही 1 ही विकेट घेऊ शकला नाही. दुसऱ्या डावात जडेजाने नाबाद 25 धावा केल्या आणि एक विकेट घेतली. त्याच्या या खराब कामगिरीनंतर दुसऱ्या कसोटीत त्याला संघात घ्यायचे की नाही, यावर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रैड हैडिन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

ऑस्ट्रेलियाचे माजी विकेटकीपर ब्रैड हैडिन (Austrelia former cricketer Brad Haddin about Jadeja) यांनी संघातील मुख्य फिरकीपटू म्हणून जडेजाच्या जागेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटलं की, जडेजा भारतातील खेळाच्या परिस्थितीत प्रभावी ठरतो, पण दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये तो चांगला पर्याय ठरू शकत नाही.

ब्रैड हैडिन (Brad Haddin) यांचं मत आहे की, जडेजाला संघात जागा तेव्हाच मिळावी, जेव्हा भारत त्याला दुसऱ्या फिरकीपटूच्या रूपात खेळवायचा विचार करत असेल. त्यांनी असंही सांगितलं, मला वाटत नाही की जडेजा प्रभावी ठरू शकतो. हो, तो चांगले अष्टपैलू खेळाडू आहे आणि दुसऱ्या फिरकीपटूच्या भूमिकेत खेळू शकतो. पण मला वाटतं की, टीम इंडियाने जास्त आक्रमक व्हायला हवं. कमी अनुभवी गोलंदाजांसह कसोटी सामना हरायची तयारी ठेवावी लागेल.

ब्रैड हैडिन पुढे म्हणाले, मी कुलदीपकडे (Kuldeep yadav) पाहीन, कारण तो एक आक्रमक फिरकीपटू आहे, जो विकेट घेऊ शकतो. दुसऱ्या बाजूला काटेकोर गोलंदाजी करणारे गोलंदाज असतील. सिराज (Mohmmed Siraj) ती भूमिका निभावू शकतो. पण मला वाटतं संघाने गोलंदाज निवडताना थोडं अधिक धाडस दाखवायला हवं.

याशिवाय ते पुढे म्हणाले, जर भारत नितीश कुमार रेड्डीला खेळवतो (Nitish Kumar Reddy) , तर मग जडेजाला संघात ठेवायची गरज नाही. त्याच्या जागी एखादा आक्रमक फिरकी गोलंदाजांचा पर्याय आणायला हवा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---