भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमवर खेळला जाणार आहे. 9 मार्च रोजी सुरू होणाऱ्या या सामन्यातवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारत 2-1 अशा आघाडीवर असला, तर हा शेवटचा सामना जिंकणे त्यांच्यासाठी महत्वाचे आहे. तत्पूर्वी अहमदाबाद कसोटीच्या खेळपट्टीची चर्चा सर्वत्र रंगली आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा चौथा कसोटी सामना जिंकावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाने इंदोर कोसटी नावावर केल्यावर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी जागाही पक्की केली होती. इंदोर कसोटी आणि त्याआधीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टी हा चर्चेचा विषय ठरला. पहिल्या तिनही कसोटी सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांना फायदा मिळाला असून फलंदाज धावा करण्यासाठी झगडताना दिसले. अशात चौथ्या कसोटीत देखील खेळपट्टी महत्वाची भूमिका बजावणार असे सांगितले जात आहे.
इंदोर कसोटीच्या पहिल्या दिवसापासूनच खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मिदत मिळाली. परिणामी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात सामना संपला. आयसीसीने याची दखल घेत खेळपट्टीला खराब शेरा दिला. अशात बीसीसीआय चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टीवर विशेष लक्ष देईल, असेही सांगितेल जाते. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी अहमदाबाद स्टेडियमच्या खेळपट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोतील दोन्ही खेळपट्टी दिसत असून यातील नेमकी कोणती खेळपट्टी चौथ्या कसोटीत वापरली जाणार, हे अद्याप समजू शकले नाहीये. व्हायरल फोटोते खेळपट्टी ग्रीन टॉप असल्याचेही दिसते. अशात पहिल्या तीन सामन्यांपेक्षा वेगळी म्हणजेच वेगवान गोलंदाजीला अनुकूल अशी खेळपट्टी अहमदाबाद कसोटीत पाहायला मिळू शकते.
Genuine confusion in Australian call over which pitch is being prepared at Narendra Modi Stadium pic.twitter.com/s2gzc4Z0fU
— Peter Lalor (@plalor) March 7, 2023
उभय संघांतील या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेचा एकंदरीत विचार केला, तर तिन्ही सामने तिसऱ्या दिवशी निकाली निघाले. पहिल्या सामन्यात भारताने तब्बल एक डाव आणि 132 धावांनी जिंकला. उभय संघांतील दुसरा सामना भारताने 6 विकेट्सने जिंकला. तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात मात्र भारताला 9 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. (Ahead of the fourth Test, the photos of the two pitches are going viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा ‘कॅप्टन कूल’ धोनीची सटकते, ऑस्ट्रेलियन पत्रकाराला थेट शेजारी बसवून शिकवलेला धडा
महिला आरसीबी संघ ट्रोलर्सच्या निशाण्यावर, नेटकरी ‘अशी’ घेत आहे मजा, पाहा टॉप 10 मीम्स