आयपीएल 2023 हंगाम अवघ्या काही दिवसांवर आला असताना खेळाडूंच्या दुखापतीच्या बातम्या समोर येत आहेत. कोलकाता नाईट रायडर्सला देखील आयपीएल सुरू होण्यापूर्वी खेळाडूंच्या दुखापतीमुळे धक्यावर धक्के बसत आहे. केकेआरचा प्रमुख फलंदाज नितीश राणा याला सराव सत्रादरम्यान दुखापत झाल्याचे समोर येत आहे. माध्यमांशी बोलताना मात्र दुखापत गंभीर नसल्याचे राणाने सांगितले.
आयपीएल 2023 (IPL 2023) चा पहिला सामना 31 मार्च रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गतविजेता संघ गुजराद टायटन्स यांच्यातील लढतीने आयपीएल 2023ची सुरुवात होणार आहे. केकेआरला (KKR) त्यांचा पहिला सामना 1 एप्रिल रोजी खेळायचा आहे. पहिल्या सामन्यात केकेआरपुढे पंजाब किंग्ज संघाचे आव्हान असेल. आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी केकेआर संघ इडेन गार्डन्सवर सराव करत आहे. याठिकाणी नितीश राणा (Nitish Rana) याने दोन वेगवेगळ्या खेळपट्टींवर फलंदाजीचा सराव केला. यादरम्यानच चेंडू त्याच्या घोट्याला लागला आणि सपोर्ट स्टाफने तत्काळ त्याच्याभोवती जमा झाला.
दुखापतीनंतर नितीश राणाने नाही केला सराव.
चेंडू लागल्यानंतर नितीश राणा खूपच वेदनेत दिसत होता, त्यामुळे पायातील शूज आणि मोजे त्याने काढले. दुखापत झाल्यानंतर अंदाजे पाच मिनिट राणा खेळपट्टीवर पडून राहिला आणि त्यानंतर उठून तो मैदानाबाहेर गेला. या दुखापतीनंतर राणा अद्याप कुठलाच सराव करताना दिसला नाहीये. राणा दुखापतीनंतर आपल्या डाव्या घोट्याला पट्टी बांधून मैदानात बसलेला दिसला. ड्रेसिंग रूममध्येही त्याच्यापण उपचार केल्याची माहिती दिली गेली.
दरम्यान, केकेआरचा कर्णदार श्रेयस अय्यर आधीच दुखापतीमुळे आगामी हंगामातून बाहेर झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयस भारतीय संघाचा भाग होता, पण शेवटच्या कसोटीदरम्यान त्याला दुखापत झाल्याचे समोर आले, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागली. त्याव्यतिरिक्त कोलकाता संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याला देखील दुखापतीमुळे मालिकेतील काही सामन्यांमधून माघार घ्यावी लगणार आहे. अशात राणाची दुखापत जर गंभीर अशली, तर केकेआरसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो.
(Ahead of the start of IPL 2023, KKR’s Nitish Rana suffered an injury during a practice session)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल 2023 मध्ये धोनी दिसणार नवीन भूमिकेत! व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘या’ दोन व्यक्तींवर सोपवली गेली बुमराहच्या पुनरागमनाची जबाबदारी! कोच-कॅप्टनलाही नाही मिळणार अपडेट