भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील 2 कसोटी सामने खेळले गेल. दोन्ही सामन्यात न्यूझीलंडने भारताचा धुव्वा उडवत मालिका 2-0 ने आपल्या खिशात घातली. आता तिसरा कसोटी सामना (1 ते 5 नोव्हेंबर) दरम्यान मुंबईच्या वानखेडेवर खेळला जाणार आहे. तत्पूर्वी मुंबईच्या मैदानावर भारताविरूद्ध एकाच डावात 10 विकेट्स घेतलेल्या एजाज पटेलने (Ajaz Patel) तिसऱ्या सामन्यापूर्वी मोठे वक्तव्य केले आहे.
एजाज पटेलने (Ajaz Patel) 3 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये भारताविरूद्ध एका डावात 119 धावांत सर्व 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे हे मैदान त्याच्यासाठी खास बनले आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी एजाज पटेल म्हणाला, “मुंबईला परत येणे नेहमीच खास असते आणि हे असे ठिकाण आहे की मी घरी कॉल करू शकतो. इथे पुन्हा खेळण्याची संधी मिळणे खूप खास आहे. खरे सांगायचे तर, भारताच्या सर्व 10 विकेट्स घेतल्यानंतर, मला माझ्या कारकिर्दीत पुन्हा येथे खेळण्याची संधी मिळेल याची खात्री नव्हती.
पुढे बोलताना एजाज पटेल (Ajaz Patel) म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचे तर माझी स्मरणशक्ती खूपच कमकुवत आहे आणि त्यामुळे ती कोणत्या प्रकारची खेळपट्टी होती, हे मला चांगले माहीत नाही. मला फक्त इतकेच आठवते की सुरुवातीपासूनच खेळपट्टी कोरडी दिसत होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
Champions Trophy 2025; पाकिस्तान कर्णधाराला झाली भारताची आठवण! म्हणाला…
केएल राहुलच्या जागी कोण बनणार लखनऊचा कर्णधार? सर्वात मोठ्या दावेदाराचं नाव उघड
IPL 2025; मेगा लिलावापूर्वीच शुबमन गिलनं जिंकली चाहत्यांची मनं! घेतला मोठा निर्णय