आतापर्यंत आपण अनेक खेळाडूंना क्रिकेटविश्वात शतक झळकवताना पाहिले आहे. आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात खेळाडू शतक झळकवताना दिसले आहेत. काही वर्षांपुर्वी टी-१० या एका नवीन स्वरूपाचे क्रिकेटमध्ये आगमन झाले होते व टी-१० सामन्यांना क्रिकेट चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळाला. टी-१० क्रिकेटमध्ये आतापर्यंत अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. सोमवारीही (०७ जून) एचा नव्या विक्रमाची या लीगमध्ये भर पडली.
युरोपियन क्रिकेट सिरीज (ईसीएस) टी-१० स्पर्धेमध्ये क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतकाची नोंद झाली आहे. अहमद मुसद्दीक याने कुमरफेल्डर स्पोर्टवेरिन आणि टीएचसीसी हैम्बर्ग या सामन्यात सर्वात वेगवान शतकाची नोंद केली आहे.
अहमद मुसद्दीकने हे शतक केवळ २८ चेंडूंमध्ये पूर्ण केले व सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. या ३२ वर्षीय फलंदाजाने पहिल्या चेंडूपासूनच जोरदार फलंदाजी करायला सुरवात केली व केवळ ३३ चेंडूत त्याने ११५ धावा करीत आपल्या संघाला १० षटकात १९८/२ च्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. त्याच्या अप्रतिम खेळीत त्याने ७ चौकार आणि १३ षटकार मारले. त्याने हैम्बर्गच्या सर्व खेळाडूंना मैदानाच्या चारही कोपऱ्यात पळवले.
अहमदने त्याच्या फलंदाजीची सुरुवात फ्रंट फूटवरून आणि अभिनंदन झाच्या प्रथम षटकात २६ धावा करीत केली. त्यानंतर त्याला कोणीही थांबवू शकले नाही. दरम्यान त्याने ५व्या षटकात बेहराम अलीला पाठोपाठ ४ षटकार मारले व आपले अर्धशतक केवळ १३ चेंडूत साजरे केले. त्यानंतर १०० धावांच्या भागीदारी नंतर त्याचा सोबती खेळाडू बादझाल्यानंतरही त्याच्या फलंदाजीची शैली बदलली नाही. त्याने त्याची जोरदार फटकेबाजी थांबवली नाही. २८ व्या चेंडूवर एक धाव काढत आपले शतक साजरे केले.
२८ चेंडूत शतक मारल्यानंतरही अहमदने ५ चेंडू खेळले. तो ३३ चेंडूत ११५ धावा करून बाद झाला. याच शतकासोबत अहमद हा युरोपियन क्रिकेट सिरीजमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावणारा फलंदाज बनला. याआधी हा विक्रम इंडियन क्रिकेट क्लबचा फलंदाज गोहर मननच्या नावी होता. त्याने त्याच्या संघाकडून खेळताना २९ चेंडूत शतक झळकवले होते.
महत्वाच्या बातम्या
नासिर हुसेननंतर माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने देखील इंग्लिश खेळाडूंवर केली बोचरी टीका; म्हणाला…
कसोटी चॅम्पियनशीप फायनलपूर्वी केन विलियम्सनने भारतीय संघाबद्दल ‘असे’ व्यक्तव्य करुन जिंकली मने
राशीद खानला करायची आहे सचिन तेंडुलकर विरुद्ध गोलंदाजी; ‘हे’ आहे कारण