क्रिकेटटॉप बातम्या

या गोलंदाजासमोर बुमराह शमीही फेल, अशी कामगिरी करणारा जगातील केवळ चौथा बाॅलर

पाकिस्तानचा संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. ज्याठिकाणी दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या स्टार वेगवान गोलंदाजाने एक मोठा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. शाहीन शाह आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात तीन विकेट घेतल्या. या सामन्यात त्याची गोलंदाजी अप्रतिम होती. अशा परिस्थितीत शाहीन आफ्रिदीने मोठा पराक्रम आपल्या नावे केला आहे.

दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या जात असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 183 धावा केल्या. यादरम्यान शाहीन शाह आफ्रिदीने 4 षटकात केवळ 22 धावा देत 3 बळी घेतले. या सामन्यात तिसरी विकेट घेताच त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 बळी घेतले. आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 100 बळी घेणारा तो 20वा गोलंदाज ठरला आहे.

शाहीन शाह आफ्रिदीच्या नावावर क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट्स आहेत. जगातील केवळ तीनच गोलंदाजांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. अशी कामगिरी करणारा शाहीन आफ्रिदी चौथा खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी श्रीलंकेचा लसिथ मलिंगा, न्यूझीलंडचा टीम साऊथी आणि बांग्लादेशचा शाकिब अल हसन यांनी ही कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही हे केलेलं नाही.

शाहीन शाह आफ्रिदी हा पाकिस्तानच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तानसाठी त्याने 31 कसोटी सामन्यात 116 विकेट्स, 56 एकदिवसीय सामन्यात 112 बळी आणि आता 74 सामन्यात 100 बळी घेतले आहेत. त्याची आतापर्यंतची कारकीर्द अप्रतिम आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात आफ्रिदीने रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर आणि नाकाबायोमजी पीटर यांना बाद केले. नाकाब्योमजी पीटर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याचा 100 वा बळी ठरला आहे.

हेही वाचा-

BAN vs WI; टी20 मालिकेसाठी बांगलादेश संघाची घोषणा!
IND vs AUS; भारतीय संघात बदल होणार? माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी
भारतीय संघाच्या जर्सीवर नाव लिहिण्यासाठी किती पैसे घेते BCCI?

Related Articles