मागील 56 दिवसांपासून भारतातील बारा शहरांमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 चा अंतिम सामना रविवारी (28 मे) खेळला जाणार होता. मात्र सलग पाच तास झालेल्या मुसळधार पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी (29 मे) खेळण्यात येईल. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. रविवारी पावसामुळे नाणेफेक देखील न झाल्याने आता सोमवारी अहमदाबादचे वातावरण कसे असेल याकडे सर्वांची नजर लागली आहे.
रविवारी पावसामुळे नाणेफेक न होताच सामना दुसऱ्या दिवशी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. सोमवारी दुपारपर्यंत अहमदाबाद मध्ये स्वच्छ व निरभ्र वातावरण राहील. सायंकाळच्या वेळेस ढगाळ वातावरण होऊन सहा वाजण्याच्या सुमारास काही सरी बरसू शकतात. मात्र, त्याचा जोर अधिक नसेल. या पार्श्वभूमीवर सामना काहीसा उशिराने सुरू होईल, मात्र पूर्ण षटकांचा सामना पाहायला मिळू शकतो. सायंकाळी आठ-नऊ वाजण्याच्या सुमारासही वातावरण ढगाळच राहील. अशात पुन्हा पाऊस सुरू झाल्यास खेळाडू व प्रेक्षकांचा पुन्हा हिरमोड होऊ शकतो.
सोमवारी पुन्हा पाऊस आल्यास 9:35 मिनिटांपर्यंत एकाही षटकाची कपात केली जाणार नाही. मात्र, सामना दहा वाजेपर्यंत सुरू झाल्यास प्रत्येकी 17 षटकांचा खेळ होईल. तर 10:30 पर्यंत खेळ सुरू झाल्यास प्रत्येकी 15 षटकांचा खेळ होणार आहे. तसेच 11 वाजण्याच्या पुढे खेळ सुरू झाल्यास 12 षटकांचा खेळ होईल. व्यतिरिक्त 12 वाजून 5 मिनिटांपर्यंत खेळ सुरू झाला तर प्रत्येकी पाच षटकांचा सामना होऊ शकतो. तसे न झाल्यास हा सामना रद्द करून, साखळी फेरीत सर्वाधिक गुण मिळवल्यामुळे गुजरात टायटन्स संघ विजयी घोषित करण्यात येईल.
(Ahmedabad Weather Forecast For Monday 29 May For IPL 2023 Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पावसाने केले क्रिकेटप्रेमींच्या हृदयाचे पाणी-पाणी! जगभरातील चाहते फायनल न पाहताच परतले माघारी
“तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया