“तुम्ही वडिलांच्या गळ्यात हात टाकता का?”, हार्दिकच्या कृतीवर गावसकरांची संतप्त प्रतिक्रिया

सर्व क्रिकेटप्रेमींना आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या महासंग्रामाची प्रतीक्षा लागली आहे. हा अंतिम सामना गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात रविवारी (दि. 28 मे) खेळणे ठरले होते. मात्र, रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सामना राखीव दिवशी म्हणजे सोमवारी खेळण्याचे निश्चित झाले. मात्र त्याचवेळी प्रसारण वाहिनीशी संवाद जपताना भारताचे सर्वकालीन महान फलंदाज सुनील गावसकर यांनी हार्दिक पंड्या याच्यावर टीका केली आहे.
हा बहुप्रतीक्षित अंतिम सामना पावसामुळे लांबत असताना, गावसकर हे आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या वाहिनीशी बोलत होते. त्यावेळी हार्दिक व धोनी यांच्यातील काही क्षणचित्रे दाखवण्यात आली. यामध्ये हार्दिक धोनीच्या गळ्यात हात टाकलेला दिसून आला. त्यावर प्रतिक्रिया देताना गावसकर म्हणाले,
“हार्दिक व धोनी यांच्यातील नाते चांगले आहे. मात्र, हार्दिकने त्याला थोडा सन्मान देणे गरजेचे आहे. धोनी खूप महान खेळाडू असून, हार्दिकचे त्याच्या गळ्यात हात टाकणे शोभत नाही. तुम्ही तुमच्या वडिलांच्या काकांच्या गळ्यात असा हात टाकता का? मला ही गोष्ट थोडीशी खटकते. आमच्या वेळी या गोष्टी होत नसत. मात्र, आता खेळाडूंमधील ऋणानुबंध अगदी लवकर वृद्धिंगत होतात.”
हार्दिक पंड्या याचा गुजरात टायटन्स संघ आयपीएल इतिहासात सलग दोन किताब जिंकणारा तिसरा संघ बनू शकतो. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्स संघ पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याचा प्रयत्न करेल. गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर सोमवारी ( 29 मे) पार पडणार आहे.
(Sunil Gavaskar Slams Hardik Pandya On His Too Friendly Relationship With MS Dhoni)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: आयपीएल अंतिम सामन्यात महिला चाहतीकडून पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण, पाहा नक्की काय घडल
‘सासऱ्यांनी हिरवा कंदील दिला’, गिलचे कौतुक करण सचिनला पडले महागात; मीम्स जोरदार व्हायरल