पुणे – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज मध्ये आज प्ले-ऑफसच्या दुसऱ्या दिवशी क्वालिफायर 3 व 4 हे सामने अहमदनगर व कोल्हापूर या संघानी अनुक्रमे जिंकत सेमी फायनल साठी पात्र झालेत. तर आज झालेल्या एलिमिनेटर 3 व 4 मध्ये मुंबई शहर व रत्नागिरी संघ एलिमिट झाले तर सांगली व नाशिक संघ सेमी फायनल क्वालिफायर सामन्यासाठी पात्र ठरले. उद्या सेमी फायनल क्वालिफायर विजते संघ सेमी फायनल साठी पात्र होतील.
आज झालेल्या क्वालिफायर 3 च्या सामन्यात अहमदनगर संघाने नंदुरबार संघाचा धुव्वा उडवला. अहमदनगर संघाने 62-14 असा एकतर्फी विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश मिळवला. प्रफुल झवारे ने चढाईत 16 गुण तर आदित्य शिंदे ने चढाईत 12 गुण मिळवले. संकेत खलाटे ने पकडीत 7 तर सौरव मेद ने पकडीत 5 गुण मिळवले. दुसऱ्या क्वालिफायर मध्ये कोल्हापूर संघाने पालघर संघाचा धुव्वा उडवला. कोल्हापूर कडून सौरभ फगारे ने अष्टपैलू खेळ करत 16 गुण मिळवले. साहिल पाटील ने 11 तर ओमकार पाटील ने 8 गुण मिळवले. साईप्रसाद पाटील ने पकडीत 5 गुण मिळवले.
एलिमिनेटर 3 च्या सामन्यात सांगली संघाने मुंबई शहराचा 48-26 असा पराभव करत सेमी फायनल क्वालिफायर सामन्यासाठी प्रवेश मिळवला. सांगलीच्या अभिषेक गुंगे ने चढाईत गुण मिळवले तर अशपक अत्तर ने पकडीत गुण मिळवले. शुभम पाटीलने अष्टपैलू खेळ केला. एलिमिनेटर 4 च्या सामन्यात नाशिक संघाने रत्नागिरी संघावर 33-28 असा विजय मिळवत सेमी फायनल क्वालिफायर साठी प्रवेश मिळवला. नाशिकच्या विजयात ईश्वर पथाडे व प्रविण व्हडकर ने महत्वपुर्ण भूमिका निभावली. तसेच सिद्धांत संदनशिव ने बचावत उत्कृष्ट खेळ करत 5 गुण मिळवले. रत्नागिरी कडून अमरसिंग कश्यप ने संघर्ष पूर्ण खेळी केली.
आज होणारे सामने:-
सेमी फायनल क्वालिफायर 1 – नंदुरबार विरुद्ध सांगली
सेमी फायनल क्वालिफायर 2 – पालघर विरुद्ध नाशिक
सेमी फायनल 1 – अहमदनगर विरुद्ध से.फा. क्वालिफायर 1 विजयी
सेमी फायनल 2 – कोल्हापूर विरुद्ध से.फा. क्वालिफायर 2 विजयी