पुणे (20 मार्च 2024) – के. एम.पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये प्रमोशन फेरीच्या दुसऱ्या दिवशी अहमदनगर, पालघर व कोल्हापूर संघांनी सलग दुसरा विजय मिळवला. तर नंदुरबार संघाने प्रमोशन फेरीतील आपला पहिला विजय मिळवला. आज झालेल्या सर्व लढती एकतर्फी झाल्या.
आज झालेल्या पहिल्या सामन्यात अहमदनगर संघाने बीड संघावर एकतर्फी मात देत प्रमोशन फेरीतील दुसरा विजय मिळवला. पुन्हा एकदा प्रफुल झावरे विजयाचा शिल्पकार ठरला. प्रफुल ने चढाईत एकूण 18 गुण मिळवले. तर सौरव मेद ने जबरदस्त 7 पकडी केल्या. आजच्या दुसऱ्या लढतीत पालघर संघाने रत्नागिरी संघावर 47-30 असा एकतर्फी विजय मिळवला. पालघरच्या प्रतिक जाधवने चढाईत 20 गुण मिळवत आपल्या संघांचा विजय सुनिश्चित केला. तर रत्नागिरीच्या अभिषेक शिंदे ने 14 गुणांची खेळी केली मात्र तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
आज झालेल्या तिसऱ्या सामान्यात सुद्धा तेच चित्र बघायला मिळाले पहिल्या दिवशी जिंकलेल्या कोल्हापूर संघाने विजय मिळवला व पहिल्या दिवशी पराभूत झालेल्या मुंबई शहर ला प्रमोशन फेरीत दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. कोल्हापूर संघाने मुंबई शहर वर 42-19 असा विजय मिळवला. तर आजच्या चौथ्या सामन्यात नंदुरबार संघाने 60-33 असा एकतर्फी विजय मिळवत प्रमोशन फेरीत गुणतालिकेत गुणांचा खात उघडला. जयेश महाजन नंदुरबारच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
प्रमोशन फेरी गुणतालिका.
1. अहमदनगर – 12 गुण (2 सामने)
2. पालघर – 12 गुण (2 सामने)
3. कोल्हापूर – 11 गुण (2 सामने)
4. नंदुरबार – 6 गुण (2 सामने)
5. सांगली – 6 गुण (2 सामने)
6. रत्नागिरी – 1 गुण (2 सामने)
7. मुंबई शहर – 0 गुण (2 सामने)
8. बीड – 0 गुण (2 सामने)
महत्वाच्या बातम्या –
अश्विन ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीचं काय नातं? सोशल मीडिया पोस्टमुळे सुरू झाली चर्चा
प्रमोशन फेरीत कोल्हापूरचा दुसरा विजय, तर मुंबई शहरचा दुसरा पराभव