अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध मुंबई शहर मौर्य मेवरीक्स या दोन प्रतिस्पर्धी संघाच्या मध्ये आज महत्वपूर्ण लढत झाली. अहमदनगर संघाची टॉप 2 मध्ये जागा निश्चित झाली होती तर मुंबई शहर तिसऱ्या स्थानी असल्याने हा सामना जिंकून टॉप 2 मध्ये जागा मिळवण्यासाठी आज प्रयत्न करण्यासाठी मैदानात उतरला होता. स्पर्धेतील बलाढ्य अहमदनगर संघाने सुरुवाती पासून आक्रमकता दाखवत मुंबई शहर संघाला पाचव्या मिनिटाला ऑल आऊट करत आघाडी मिळवली.
प्रफुल झवारेच्या चपळ चढायांनी, अजित पवार व अभिषेक पवार च्या जबरदस्त पकडीनी अहमदनगर संघाने मध्यांतरला 22-13 अशी आघाडी मिळवली होती. मध्यांतरा नंतर दोन्ही संघ एकमेकांना चांगली टक्कर देत होते. निखिल पाटील व शार्दूल पाटील यांच्या चतुरस्त्र खेळीने सामन्यात चुरस आणली होती.
सामन्याचा शेवटचा दीड मिनिटं शिल्लक असताना मुंबई शहर ने अहमदनगर संघाला ऑल आऊट करत 30-33 अशी आपली पिछाडी कमी करत सामन्यात रंगत आणली होती. मात्र प्रफुल झवारे व शिवम पटारे ने सावध खेळ करत अहमदनगर संघाला 35-32 असा विजय मिळवून दिला. या विजयाने अहमदनगर संघाने प्रमोशन फेरीत पहिले स्थान निश्चित केले. अहमदनगर संघाकडून प्रफुल ने 10 गुण मिळवले तर पकडीत अजित पवार ने 4 तर अभिषेक पवार ने 3 गुण मिळवले. मुंबई शहर कडून निखिल पाटील ने 10 गुण मिळवले. (Ahmednagar Periyar Panthers team secure first place in promotion round)
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- अजित पवार, अहमदनगर पेरियार पँथर्स
कबड्डी का कमाल- निखिल पाटील, मुंबई शहर मौर्य मेवरीक्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शिखर माणूस म्हणून सर्वोत्तम’, गब्बरच्या व्यक्तिमत्त्वाची चाहती बनली संघमालकीण प्रिती झिंटा
ठाणे हम्पी हिरोजकडून कोल्हापूर संघाला धक्का