दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (south africa vs India) या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना बोलॅंड पार्कच्या (Boland park) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारताकडून वनडेत पदार्पण करत असलेल्या वेंकटेश अय्यरने (Venkatesh iyer) पहिल्याच सामन्यात असा काही कारनामा केला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या वेंकटेश अय्यरला (Venkatesh iyer debue) अखेर वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात फलंदाजीला येण्यापूर्वी क्षेत्ररक्षण करत असताना त्याने असे काही केले, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.(Aiden markam run out by venkatesh Iyer)
तर झाले असे की, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावातील १८ वे षटक सुरू होते. हे षटक टाकण्याची जबाबदारी केएल राहुलने आर अश्विनला दिली होती. त्यावेळी षटकातील चौथ्या चेंडूवर एडन मार्करमने सरळ बॅटने एक शॉट खेळला आणि एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा हा प्रयत्न पूर्णपणे फसला, कारण मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या वेंकटेश अय्यरने हा चेंडू उचलला आणि गोलंदाजाच्या दिशेने डायरेक्ट थ्रो केला. फलंदाज पोहोचणार इतक्यात थ्रो यष्टीलाही लागला आणि फलंदाज बाद होऊन माघारी परतला. एडन मार्करम अवघ्या ४ धावा करत माघारी परतला.
https://twitter.com/JalaluddinSark8/status/1483741622706012160?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1483741622706012160%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket%2Find-vs-sa-1st-odi-markram-wicket%2F
दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या उभारला २९६ धावांचा डोंगर
या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिका संघाकडून प्रथम फलंदाजी करताना, रासी वान डर दुसेनने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले. तर टेंबा बावुमाने ८ चौकारांच्या साहाय्याने ११० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाला ५० षटक अखेर ४ बाद २९६ धावा करण्यात यश आले.
महत्वाच्या बातम्या :
भारताचा २६वा वनडे कर्णधार बनला केएल राहुल, पाहा आजवर झालेल्या वनडे कर्णधारांची संपू्र्ण यादी
अष्टपैलू कामगिरीने तगड्या संघांची ‘शाळा’ घेणारा बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला ‘स्कॉलर’ अय्यर
हे नक्की पाहा :