भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा (Ajay Jadeja) सध्या चर्चेत आहे. कारण अजय जडेजाला गुजरातच्या जामनगर राजघराण्याने जामनगर शाही सिंहासनाचा वारस म्हणून घोषित केले आहे. जामनगरच्या राजघराण्यातील शत्रुशल्य सिंह जी महाराज यांनी त्यांच्यासंदर्भात ही घोषणा केली. तेव्हापासून अजय जडेजा (Ajay Jadeja) चर्चेचे कारण बनला आहे.
जामनगरच्या राजघराण्याचा वारस होण्यापूर्वी अजय जडेजा (Ajay Jadeja) सुमारे 25 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा मालक होता. मात्र राजघराण्याचे नवे सिंहासन मिळाल्यानंतर त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. आता तो पैशांच्या बाबतीत भारतीय संघाचा माजी कर्णधार ‘विराट कोहली’च्याही (Virat Kohli) पुढे गेला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार विराट कोहलीची (Virat Kohli) सध्याची संपत्ती 1,000 हून अधिक कोटी रुपये आहे. तर जामनगरचा उत्तराधिकारी बनल्यानंतर अजय जडेजाची (Ajay Jadeja) एकूण संपत्ती 1,455 कोटी रुपये झाली आहे.
View this post on Instagram
अजय जडेजाच्या (Ajay Jadeja) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर अजय जडेजा हा त्याच्या काळातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक मानला जातो. त्याने 15 कसोटी सामने आणि 196 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात त्याने कसोटीत 516 धावा आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,359 धावा केल्या. अजय जडेजाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 6 शतकांसह 30 अर्धशतके झळकावली.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs NZ; कसोटी मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का! स्टार खेळाडूच्या खेळण्यावर सस्पेन्स
PAK vs ENG; बाबर आझमचे पुनरागमनाचे दरवाजे बंद? बदली खेळाडूने ठोकले शानदार शतक
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबाबत कर्णधाराचे मोठे अपडेट, AUS दौऱ्यातूनही बाहेर?