---Advertisement---

अजय जयरामचा यूएस ओपनच्या उंपात्य फेरीत प्रवेश

---Advertisement---

भारताचा बॅडमिंटनपटू अजय जयरामने शनिवारी यूएस ओपनच्या उंपात्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत 70 व्या स्थानी असणाऱ्या दक्षिण कोरियाच्या हे क्वांग ही चा उपांत्यपूर्व फेरीत 21-18 21-12 अशा फरकाने सरळ सेटमध्ये पराभव केला.

30 मिनिटे चाललेल्या या लढतीत अजयने पहिल्या सेटची चांगली सुरवात केली होती. त्याने 10-4 अशी आघाडी घेतली होती. परंतू हे क्वांग हीनेही जोरदार प्रतिकार करत 9-10 अशी अजयची आघाडी कमी केली. पण त्यांनंतर पुन्हा खेळ सुधारत अजयने या सेटमध्ये 21-18 असा विजय मिळवला.

पहिल्या सेटप्रमाणे दुसऱ्या सेटमध्येही अजयने 5-3 ने आघाडी घेतली होती. पण हे क्वांग ही देखील त्याला चांगली टक्कर देत होता. पण अजयने सलग 5 पॉइंट्ची कमाई करत 13-8 अशी आघाडी वाढवली आणि अखेर हा सेटही सहज जिंकत सामनाही जिंकला.

अजयचा  उंपात्य फेरीतील सामना सहाव्या मानांकीत फ्रांन्सच्या मार्क कॅलजॉउ विरुद्ध होणार आहे. 

अजयला मागील वर्षी सीनियर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो जागतिक क्रमवारीत 13 क्रंमांकावरून थेट 134 व्या क्रमांकावर घसरला आहे.

त्याने यावर्षी झालेल्या इंडिया ओपनमध्ये टॉमी सुजियर्टो विरुद्ध खेळताना 2 पॉइंट्सनंतरच माघार घेतली होती. मात्र त्यानंतर तो चायना मास्टर्स, न्यूझीलंड ओपन आणि आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या: 

आयपीएलने नाकारल म्हणुन काय झालं; डेविड वॉर्नर खेळणार या मोठ्या लीगमध्ये

मेस्सीला आज सुनिल छेत्रीच्या पुढे जाण्याची संधी

मुरलीधरन-जयवर्धनेचा श्रीलंकन क्रिकेट मंडळावर जोरदार बाऊंसर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment