पुणे। प्रो कबड्डीमध्ये आज (23 आॅक्टोबर) पुणेरी पलटन विरुद्ध तमिळ थलायवाज यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात तमिळ थलायवाजचा कर्णधार अजय ठाकूरने एक खास विक्रम केला आहे.
त्याने प्रो कबड्डीमध्ये 600 रेड पॉइंट्स मिळवण्याचा टप्पा पार केला आहे. पुण्याचा कर्णधार गिरीश एर्नाक हा अजयचा 600 वा बळी ठरला.
हा टप्पा गाठणारा अजय केवळ तिसराच कबड्डीपटू ठरला आहे. याआधी राहुल चौधरी आणि परदीप नरवालने हा टप्पा गाठला आहे.
अजयने हा पराक्रम त्याच्या 87 व्या सामन्यात केला आहे. याबरोबरच अजय सर्वाधिक यशस्वी रेड करण्याच्या यादीतही तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सामन्याआधी त्याने 475 यशस्वी रेड केल्या होत्या.
राहुलने या सामन्याच्या आधी पार पडलेल्या यू मुम्बा विरुद्ध तेलगू टायटन्सच्या सामन्यात 700 रेड पॉइंट्स मिळवण्याचा पराक्रम केला आहे. असा पराक्रम करणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे.
प्रो कबड्डीमध्ये सर्वाधिक रेड पॉइंट्स घेणारे कबड्डीपटू-
700 – राहुल चौधरी
671 – परदीप नरवाल
600* – अजय ठाकूर
525 – दीपक हुडा
517 – काशिलिंग अडके
महत्त्वाच्या बातम्या:
–प्रो कबड्डीमध्ये अशी कामगिरी करणारा राहुल चौधरी ठरला पहिलाच कबड्डीपटू
–दुसऱ्या वनडेतही कोहली ठरणार किंग, आरामात करणार हे ३ विक्रम आपल्या नावावर
–वयाच्या १५ वर्षी सचिनने जी ड्रेसिंगरुम शेअर केली तिथे ३० वर्षांनी करणार ही गोष्ट