---Advertisement---

करवा चौथला अजय ठाकूरने पत्नीला दिली ही खास भेट, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, ऑक्टोबर 18, 2019 12:13 PM
---Advertisement---

काल देशभरात करवा चौथचा सण साजरा झाला. या निमित्त अनेक क्रीडापटूंनीही त्यांच्या पत्नीबरोबरचे फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या भारतीय कबड्डी संघाचा कर्णधार अजय ठाकूरने करवा चौथचा काल व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

यावर्षीचं विवाहबंधनात अडकलेल्या अजय ठाकुरने पत्नीसोबत त्यांचा पहिला करावा चौथ साजरा केला. अजय ठाकूरने यावर्षी संदीप कौर यांच्याशी विवाह केला आहे.

अजयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अजयने आपल्या पत्नीला खास अंगठी भेट दिल्याचेही व्हिडिओत दिसते.

https://twitter.com/thakurkabaddi/status/1184868130742341637

यावर्षीच अजय ठाकूरला पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हे दोन्ही पुरस्कार प्राप्त झालेला हा केवळ दुसराच कबड्डीपटू आहे. प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये तामिळ थालवाज संघाचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर घरी परतला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---