करोना व्हायरस (Corona Virus) ने सर्व जगभरात अनेक देशांत लॉकडाउन झाले आहेत. भारतात २५ मार्च पासून लॉकडाउन (Lockdown) करण्यात आले. दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये डीएसपी (DSP) पदावर कार्यरत असलेला पद्मश्री पुरस्कार विजेता कबड्डीपटू अजय ठाकूर (Ajay Thakur) करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस म्हणून आपली भूमिका बजावतो आहे. हिमाचल प्रदेशमधील रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात त्याची भूमिका महत्वाची ठरतेय. ज्याप्रमाणे अजय कबड्डीत संघाचा नेतृत्व करतो त्याचप्रमाणे आज अजय करोना विरुद्ध आपल्या पोलीस दलातील सहकाऱ्यांना घेऊन त्याचे नेतृत्व करत आहे.
६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेनंतर अजय ठाकूर पोलीस दलात ड्युटी वर हजर होऊन करोना विरुद्ध सामना करत आहे. अजय ठाकूरने भारतीय कबड्डी संघाचे नेतृत्व केले आहे. तसेच गेल्यावर्षी अजयला पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
Your sefty is my. Duty pic.twitter.com/31IrnZB4bY
— Ajay Thakur (@thakurkabaddi) April 19, 2020