अपेक्षेप्रमाणे तमिळ थलाईवासने आपल्या संघाची धुरा अजय ठाकूरकडे सोपवली आहे. भारताला एकाहाती वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर अजयकडून प्रचंड अपेक्षा केल्या जात आहेत. त्यातच कर्णधारपदाची जबाबदारी आल्याने चांगले प्रदर्शन करण्याचे दडपण त्याच्यावर नक्कीच असेल.
सचिन तेंडुलकरचा संघ असल्याने या संघाकडे प्रेक्षकांचेही बारीक लक्ष्य असणार आहे. या सगळ्यात अजयला तारेवरची कसरत करावी लागणार हे मात्र खरे!
गुजरात संघाने अनुभवी सुकेश हेगडेकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सुकेश याआधी “तेलगू टायटन्स”कडून खेळला आहे. विशेष म्हणजे फझल अत्राचाली सारखा आंतरराष्ट्रीय स्थरावर कर्णधारपदाचा अनुभव असणारा खेळाडू असतानाही सुकेशवर विश्वास ठेवण्यात आला आहे!
हा विश्वास सार्थ ठरवताना सुकेशला प्रयत्नांची शर्थ करावी लागेल यात तिळमात्र शंका नाही!
-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )