प्रो कबड्डीचा सहावा मोसम 7 आॅक्टोबर पासून सुरु होत आहे. त्यामुळे आता संघांनी आपल्या कर्णधारांची नावे घोषित केली आहेत. त्याप्रमाणे तमिळ थलायवाजनेही अजय ठाकूरकडेच नेतृत्वाची धूरा कायम ठेवली आहे.
तमिळ थलायवाजने मागील वर्षी प्रो कबड्डीत पदार्पण केेले आहे. या पदार्पणाच्या मोसमातही तमिळ थलायवाजचे अजयनेच नेतृत्व केले होते.
तमिळ थलायवाजकडून खेळण्याआधी अजय बंगळूरु बुल्सकडून पहिला आणि दुसरा मोसम खेळला तर पुणेरी पलटणकडून तिसरा आणि चौथा मोसम खेळला आहे. त्याने आत्तापर्यंत प्रो कबड्डीत 80 सामन्यात 549 पॉइंट्स मिळवले आहेत.
मागीलवर्षी पाचव्या मोसमात तमिळ थलायवाजला त्यांच्या गटात तळातल्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पण यावर्षी तमिळ थलायवाजच्या संघात मनजीत चिल्लर, जसविर सिंग, सुकेश हेगडे, सुरजीत सिंग अशा अनुभवी कबड्डीपटूंचा सामावेश आहे.
त्यामुळे या सहाव्या मोसमात तमिळ थलायवाजच्या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात तमिळ थलायवाजचा पहिला सामना त्यांच्या घरच्या मैदानावर पटना पायरेट्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईला 7 आॅक्टोबर 2018 ला होणार आहे.
प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमाची सुरुवात चेन्नई लेगपासून होणार आहे. चन्नई हा लेग 11 आॅक्टोबर 2018ला संपणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–एशिया कप २०१८: अंतिम सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असलेल्या गंभीरचा क्रिकेटमधील मोठा विक्रम
–एशिया कपमध्ये सचिनने केले होते शतकांचे शतक; पण टीम इंडियाचा झाला होता नकोसा पराभव